उत्साहपूर्ण वातावरणात दिला आरोग्य संवर्धनाचा संदेश...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 12:21 AM2019-11-11T00:21:51+5:302019-11-11T00:22:29+5:30
सदृढ आरोग्याचा संदेश देणारे वयोवृध्द... महिला, युवक, युवक युवतींसह पुरूषांचा सहभाग... संगिताच्या तलावर थिरकणारे युवक... गुलाबी थंडीत धावण्याचा आनंद लूटण्यासाठी आलेले जालनेकर... अशा उत्साहपूर्ण वातावरणात शनिवारी जालना हाफ मॅरेथॉन पार पडली.
जालना : सदृढ आरोग्याचा संदेश देणारे वयोवृध्द... महिला, युवक, युवक युवतींसह पुरूषांचा सहभाग... संगिताच्या तलावर थिरकणारे युवक... गुलाबी थंडीत धावण्याचा आनंद लूटण्यासाठी आलेले जालनेकर... अशा उत्साहपूर्ण वातावरणात शनिवारी जालना हाफ मॅरेथॉन पार पडली. यावेळी पदक घेणाऱ्या प्रत्येकाच्या चेहºयावर निर्धारित वेळेत मॅरेथॉन पूर्ण केल्याचा आनंद दिसून आला.
जालना हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावटूंशी संवाद साधल्यानंतर अनेकांनी मॅरेथॉनचे महत्त्व, त्यासाठी केलेली तयारीचा उलगडा केला. अनेकांनी धावण्याचा आनंद लूटण्यासाठी मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला. काहींनी प्रथमच तर काहींनी दुसºया वेळेस जालना हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला. या शहरात असलेल्या सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, क्रीडाच्या परंपरेत आता मॅरेथॉनचाही सहभाग झाल्याचे मत अनेकांनी नोंदविले.
मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान ठिकठिकाणी धावपटूंसाठी एनर्जल ड्रिंकसह इतर सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. महामार्गावरील वाहनांचा धावपटूंना त्रास होऊ नये म्हणून पोलीस दलाच्या वतीने वाहतुकीचे नियंत्रण केले जात होते. शिवाय स्वयंसेवकांनीही या कामी मोठे सहकार्य केले.
पुरूषांमध्ये बोंबाले तर महिलांमध्ये गवाते विजयी
जालना : जालना शहरात रविवारी आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धेत पुरूष खुल्या गटातून छगन बोंबाले यांनी तर महिला खुल्या गटातून ज्योती गवते यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. मॅरेथॉनमध्ये सहभागी बालकांपासून वयोवृध्दांपर्यंत सर्वच धावपटुंचा उत्साह वाखण्याजोगा होता. विशेषत: महिला, युवतींसह वयोवृध्दांनीही या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवून आरोग्याचा संदेश दिला.
विविध गटांमध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. यात हाफ मॅरेथॉन खुल्या पुरूष गटात छगन बोंबाले प्रथम, किरण गावाते द्वितीय, तर विलास गोले तृतीय आले. हाफ मॅरेथॉन खुल्या महिला गटात ज्योती गवाते प्रथम, प्रमिला बाबर द्वितीय तर अश्विनी काटोळे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
१० किलोमीटर पुरूष १२ ते ३५ वर्षे वयोगटात किरण मात्रे प्रथम, नितीन टाळीकोटे द्वितीय तर ओम कानेरकर तृतीय आला. १० किलोमीटर पुरूष ३६ ते ५० वर्षे वयोगटात विजयकुमार गुप्ता प्रथम, राम लिंभारे द्वितीय तर अर्जुन जाधव यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. १० किलोमीटर पुरूष ५१ वर्षे व त्यावरील गटात मोहन्ना पुथियाडियली प्रथम, पंडित सोन्ने द्वितीय तर गजानन राठोड यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. १० किलोमीटर महिला १२ ते ३५ वर्षे वयोगटात अश्विनी जाधव प्रथम, निकिता मात्रे द्वितीय तर अर्चना आगळे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
तर १० किलोमीटर महिला ५१ व त्यावरील वयोगटात माधुरी निमजे प्रथम, अभा सिंग द्वितीय तर रजनी शिंदे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.