हिंगोली केंद्रबिंदु असलेल्या भूकंपाचे जालना जिल्ह्यातही जाणवले सौम्य हादरे
By शिवाजी कदम | Published: July 10, 2024 01:12 PM2024-07-10T13:12:10+5:302024-07-10T13:12:47+5:30
या भूकंपामुळे जिल्ह्यात कुठेही जिवित किंवा वित्तहानी झालेली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
जालना: बुधवारी सकाळी हिंगोली येथे भूकंपाचे तीव्र धक्के जावणवे. भूकंपाचे सौम्य हादरे जालना जिल्ह्यात देखील जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या धक्क्यांमुळे कुठेही हाणी झाल्याची नोंद प्रशासनाकडे नाही. भूकंपाचा केंद्र बिंदु हिंगोली जिल्ह्यात असला तरी याची सौम्य तीव्रता जालना जिल्ह्यात देखील जाणवली.
जिल्ह्यातील जाफराबाद, बदनापूर,अंबड, घनसावंगी, मंठा, परतूर, भोकरदनसह अंबड तालुक्यातील रोहिलागड, हस्तपोखरी, रांजणी, वाटूर येथे देखील भूकंपाचे कंपन जाणवले. जालना तालुक्यातील काही गावांमध्ये देखील भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपामुळे जिल्ह्यात कुठेही जिवित किंवा वित्तहानी झालेली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सकाळीच धक्के बसल्यामुळे अनेक नागरिक घराबाहेर आल्याचे दिसून आले होते.