दूध उत्पादकांचे दीड कोटींचे अनुदान थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:30 AM2021-05-09T04:30:53+5:302021-05-09T04:30:53+5:30
जालना जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यातच गेल्या काही वर्षांत दूध उत्पादकांना चांगले दिवस होते. परंतु महिनाभरापासून ...
जालना जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यातच गेल्या काही वर्षांत दूध उत्पादकांना चांगले दिवस होते. परंतु महिनाभरापासून त्यांचे हक्काचे ग्राहक असलेले हॉटेल चालक हॉटेल बंद असल्याने संकटात आहेत, तर दूध विक्रेत्यांचे न विचारलेलेच बरे. यातून अनेक शेतकरी हे शासकीय दूध संकलन केंद्रावर कमी भाव मिळाला तरी चालेल, पण दुधाची नासाडी नको म्हणून गेले होते. त्यांची तेथेही आर्थिक कोंडी झाल्याने ते नाराज झाले आहेत.
आता तुम्हीच आमचा प्रश्न सोडवा
जुना जालना भगातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी थकीत दूध उत्पादकांच्या व्यथा मांडण्यासाठी माजी दुग्ध विकास मंत्री अर्जुन खोतकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांना मागण्यांचे निवेदनही दिले. हे निवेदन आपण वरिष्ठ पातळीवर पाठवून लगेचच अनुदानाचा हा प्रश्न नक्की मार्गी लावू, असे आश्वासन खोतकरांनी दिल्याची माहिती दूध उत्पादक संतोष सुपारकर यांनी दिली. योवळी सुपारकर यांच्यासोबत अन्य दूध उत्पादकांची उपस्थिती होती.