जालन्यात कोट्यवधींच्या निधीची उधळपट्टी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:30 AM2017-12-14T00:30:18+5:302017-12-14T00:30:27+5:30

जिल्ह्यातील महत्त्वाचा आणि वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरत असलेल्या जालना-वडीगोद्री मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी ३३७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. असे असले तरी या भागाचे आ. नारायण कुचे यांनी आठवड्यापूर्वीच डागडुजीसाठी १५ कोटी रुपये राष्ट्रीय महामार्गाकडून मंजूर झाल्याचे सांगितले होते. त्याचप्रमाणे याचे कामही सुरु झाले आहे. या मार्गाचे काँक्रिटीकरणच करायचे होते तर डागडुजीसाठी कोट्यवधीच्या निधीची उधळपट्टी कशासाठी, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

Millions of billions of money in Jalna! | जालन्यात कोट्यवधींच्या निधीची उधळपट्टी!

जालन्यात कोट्यवधींच्या निधीची उधळपट्टी!

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांत संभ्रम : काँक्रिटीकरणासाठी ३३७ कोटी असताना १५ कोटींची डागडुजी कशाला?

राजेश भिसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील महत्त्वाचा आणि वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरत असलेल्या जालना-वडीगोद्री मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी ३३७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. असे असले तरी या भागाचे आ. नारायण कुचे यांनी आठवड्यापूर्वीच डागडुजीसाठी १५ कोटी रुपये राष्ट्रीय महामार्गाकडून मंजूर झाल्याचे सांगितले होते. त्याचप्रमाणे याचे कामही सुरु झाले आहे. या मार्गाचे काँक्रिटीकरणच करायचे होते तर डागडुजीसाठी कोट्यवधीच्या निधीची उधळपट्टी कशासाठी, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
अनेक वर्षांपासून जालना ते वडीगोद्री हा मार्ग मृत्युचा सापळा बनला आहे. या मार्गावर आतापर्यंत २९८ निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या मागणीसाठी अनेक आंदोलन करण्यात आले. महिनाभरापूर्वीच अ‍ॅड. किशोर राऊत यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय भीक मांगो आंदोलनही करण्यात आले. यातून संकलित झालेला निधी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री निधीसाठी देण्यात आला आहे. तसेच यासाठी न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.
याचा परिणाम म्हणून गत महिन्यात जालना दौºयावर आलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या मार्गाच्या सदृढीकरणासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मुंबईत गेल्यानंतर मंजूर करु, असे आश्वासन माध्यमांशी बोलताना दिले होते. हा निधी काही मंजूर झाला नाही.
याच्या काही दिवसांपूर्वीच या रस्त्याच्या डागडुजीसाठी ३ कोटींचा निधी आला होता. तोही खर्च झाला. त्यानंतर गत आठवड्यात आ. नारायण कुचे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांच्यासमवेत या मार्गाची काही ठिकाणी पाहणी केली. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी यावेळी एका अभियंत्यास निलंबितही करण्यात आले.
याचवेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आपण खा. दानवे यांच्या माध्यमातून पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करवून आणल्याचे आ. कुचे यांनी सांगितले. याचे कामही सुरु झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रस्त्याचे साईड पंखे मुरुमाऐवजी मातीने भरले जात आहेत.
या कामास प्रारंभ होऊन आठवडा उलटत नाही तोच मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केंद्र शासनाकडून ३३७ कोटी रुपयांचा निधी काँक्रिटीकरणासाठी आणल्याचे जाहीर केले.
याची निविदाही काही वृत्तपत्रांत प्रसिद्धही झाली आहे. जालना -वडीगोद्री या मार्गाचे काँक्रिटीरणच करायचे होते, तर मग १५ कोटींचा अपव्यय कशासाठी, असा प्रश्न आता नागरिंकांतून उपस्थित केला जात आहे.
केवळ कंत्राटदार पोसण्याचे काम तर शासनाकडून केले जात नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे. कधी नव्हे जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला जात आहे. मात्र, याचा विनियोग योग्य पद्धतीने होत नसल्याने सामान्य नागरिकांच्या भरलेल्या कररुपी पैशांतून केवळ ‘खड्डे’ भरणी केली जात आहे.

Web Title: Millions of billions of money in Jalna!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.