जीएसटीनंतरही बिल न घेताच लाखोंचे व्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:48 AM2018-11-22T00:48:14+5:302018-11-22T00:48:52+5:30
जीएसटी कायदा लागू झाल्यानंतरही ग्राहकांना बिलाऐवजी कच्चे बिल देऊन तो व्यवहाराच झाला नसल्याचे दर्शविणाऱ्यावर भर असल्याचे जीएसटी विभागाच्या अंमलबजावणी विभागाच्या छाप्यातून पुढे आले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जीएसटी कायदा लागू झाल्यानंतरही ग्राहकांना बिलाऐवजी कच्चे बिल देऊन तो व्यवहाराच झाला नसल्याचे दर्शविणाऱ्यावर भर असल्याचे जीएसटी विभागाच्या अंमलबजावणी विभागाच्या छाप्यातून पुढे आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून जालन्यातील ड्रायफ्रूटच्या तीन ठोक व्यापार करणाºयांच्या दुकानांवर हे छापे टाकण्यात आले.
जीएसटी विभागाच्या औरंगाबाद येथील अंमलबजावणी पथकाकडून ही तपासणी सुरू आहे. यापूर्वी कापडाचे ठोक विक्रेत्यांवर छापे टाकून त्यांच्याकडूनही मोठी कर चोरी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. आज जरी ही कर चोरी दिसत असली तरी, व्यापाºयांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यांनी झालेल्या व्यवहाराचे रीतसर कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यावर कुठलीच कारवाई होणार नाही. मात्र जर कागदपत्रांची पूर्तता न केल्यास दंड आकारणी होणार आहे.
आजही ज्या ग्राहक उपयोगी वस्तू घेताना नागरिकांचा कल हा बिल न घेण्यावर कायम असल्याचे दिसते. तसेच अनेक व्यवहारांमध्ये कच्चे बिल दिल्यावर त्याची नोंद ठेवली जात नसल्याने त्यातून करचोरी होत असल्याचे दिसून येते. एकूणच जालन्यातील व्यापार, उद्योग हा मोठ्या प्रमाणावर रोखीने करण्यावर व्यापा-यांचा भर असल्याने येथे मोठी करचोरीची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने आम्ही नियमित तपासणी करत असल्याची माहिती जीएसटी विभागाच्या अंमलबजावणी पथकातील अधिका-यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.