वक्फ बोर्डाच्या जागेचा कोट्यवधींंचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:37 AM2019-05-29T00:37:29+5:302019-05-29T00:37:59+5:30

भूखंड घोटाळ्यामुळे २२ वर्षापूर्वी जालना संपूर्ण राज्यात गाजले होते. त्यावेळी या भूखंड घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश फाटक यांची नियुक्ती केली होती.

Millions of Wakf boards land scam | वक्फ बोर्डाच्या जागेचा कोट्यवधींंचा घोटाळा

वक्फ बोर्डाच्या जागेचा कोट्यवधींंचा घोटाळा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भूखंड घोटाळ्यामुळे २२ वर्षापूर्वी जालना संपूर्ण राज्यात गाजले होते. त्यावेळी या भूखंड घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश फाटक यांची नियुक्ती केली होती. यात शहरातील खुल्या जागेसह वक्फबोर्डाच्या जागांचाही त्यात समावेश होता. त्यावेळी न्यायाधीश फाटक यांनी सदर अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. मात्र, नंतर त्यातील दोषींवर थोड्याफार प्रमाणात कायदेशीर कारवाई होऊन हे प्रकरण थंड बस्त्यात पडले होते. मात्र, आज खुद्द वक्फबोर्डच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणात राजा बाग शेर-सवार दर्गाचा मौलाना असल्याचे दाखवत सैय्यद जमिल सैय्यद जानिमिया व त्यांच्या अन्य दोन सहकाऱ्यांनी जालन्यातील भोकरदन नाका परिसरातील वक्फ बोर्डाच्या मालिकीची असलेली १८ एकर १६ गुंठे जागेवर अनेकांना प्लॉट दिले तर काहींना निकष डावलून नोटरीच्या आधारे भूखंडांची विक्री तसेच काहींशी करार करून दिले. हे करार करतांना नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत केला असून, हा भूखंड घोटाळ्याची किंमत ही कोहीशे कोटींमध्ये जाते. हा गुन्हा दाखल झाल्याने जालना पुन्हा एकदा भूखंड घोटाळ्याच्या रडावर आले आहे.
या प्रकरणी सोमवारी रात्री उशीरा सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद जमिल ,सय्यद जानीमिया (मौलाना), शेख वहीवोद्दीन शेख फकरोद्दीन, मोहम्मद मुसा मोहम्मद वाहेद अशा तीन संशयितांविरूध्द वक्फ बोर्डासह खरेदीदारांची फसणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात असलेल्या दर्ग्याच्या मुतावलीच्या नावे बनावट कागदपत्राआधारे मौलाना असल्याचे दाखविले. या प्रकरणात अजीज अहेमद सिरसाज अहेमद (सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी, वक्फ बोर्ड, औरंगाबाद) यांच्या फिर्यार्दीवरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर हे करीत आहेत.
भूखंड घेणारे अडचणीत, प्रशासनासमोर चौकशीचे आव्हान
जालना-औरंगाबाद मार्गावरील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी हे सर्व व्यवहार झाले आहेत. अनेकांनी पदरमोड करून ही जागा खरेदी केली आहे. परंतु आता ही तक्रार दाखल झाल्याने जागा खरेदीदारांचे धाबे दणाणले आहेत. भविष्यात काही निर्णय झाल्यास आमचे काय होणार अशी चिंता आतापासूनच आम्हाला सतावत असल्याने या परिसरातील व्यापाºयांनी नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर सांगितले. काही दंड आकारून तो संबंधित विक्रीदारांकडून वसूल करून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असेही अनेकांनी बोलून दाखवले. शहरातील अनेक भागांमध्येही अशा प्रकारच्या वक्फ जमिनीचे घोटाळे गाजले आहेत.

Web Title: Millions of Wakf boards land scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.