१६ लाखांचे गौण खनिज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 01:03 AM2018-09-26T01:03:04+5:302018-09-26T01:03:14+5:30
दगडवाडी येथे चंदनझिरा पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री धाड टाकत १६ लाख ४० हजार रुपये किंमतीचे मौल्यवान गौण खनिज जप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तालुक्यातील दगडवाडी येथे चंदनझिरा पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री धाड टाकत १६ लाख ४० हजार रुपये किंमतीचे मौल्यवान गौण खनिज जप्त केले.
पोलिसांना माहिती मिळाली की, दगडवाडी येथे राहणारा विठ्ठल गाने हा बेकायदेशीररीत्या उत्खनन करुन गारगोटी या गौण खनिजाचा साठा करत होता. यावरुन अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी चंदनझिरा पोलिसांसह दगडवाडी येथे छापा मारला.
यावेळी त्यांना दगडवाडी गावाच्या पाठीमागील जमिनीत गौण खनिज लपवून ठेवल्याचे आढळून आले. त्यानंतर गौण खनिज बाहेर काढून जप्त करण्यात आले. या गौण खनिजाची किंमत १६ लाख ४० हजार रुपये असून, हा सर्व साठा जप्त करण्यात आला. तसेच विठ्ठल गाने यांच्याविरुध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि. प्रमोद बोंडले करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक समाधन पवार, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक सी. जी. गिरासे, एस. इंगळे, प्रमोद बोंडळे, कर्मचारी संजय घुसिंगे, अविनाश नरवडे, रमेश वाघ, आटोळे, विशाल काळे, प्रदीप घोडके, ज्ञानेश्वर केदारे, शिवाजी डाखुरे, अनिल काळे, कृष्णा भंडागे, चालक मच्छिंद्र निकाळजे यांनी केली.