दुष्काळाच्या मदतीपासून मंठा वंचित राहणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:27 AM2018-10-21T00:27:45+5:302018-10-21T00:28:26+5:30
पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडलेले असताना त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंठा : पावसाच्या अवकृपेने यावर्षी जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीके धोक्यात आली असून शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. पावसाने खंड दिल्याने पिकांची स्थिती बिकट असून उत्पादनात प्रचंड घाट होणार आहे. अत्यंत कमी प्रमाणात पर्जन्यमान झाले आहे. याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील पीके संकटात आलेली असून शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. एकंदरीतच दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली पाहण्यास मिळत आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडलेले असताना त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
पालकमंत्र्यांनी शनिवारी जालना व मंठा तालुक्यातील काही गावातील पिकांची पाहाणी करुन शेतकºयांशी संवाद साधला.
शेतकºयांच्या पीकांसह दुष्काळसदृश्य परिस्थितीचा तात्काळ सर्वे करून त्याचा अहवाल शासनास देण्यात यावा असे निर्देश पालकमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना दिले.
यावेळी पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, मंठा तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यात होणार नसल्याची खोटी अफवा अलीकडेच व्हाट्सअप व फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर मी मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. याची दाखल घेत मुख्यमंत्र्यांनी तातडीने मंठा तालुक्यामध्ये टंचाई व पिक पाहणी परिस्थितीचा फेर आढावा घेण्याचे आदेश प्रशासनास दिले आहे. मंठा तालुक्यातील शेतकºयांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
यानंतर त्यांनी मंठा येथे आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, कृषी अधिकारी माईणकर, झनझन, एसडीएम ब्रिजेश परील, तहसीलदार सुमन मोरे, भाऊसाहेब कदम, गणेश खवणे, बिडी पवार, नाथराव काकडे, नरसिंग राठोड, नागेश घारे, शिवदास हनवते, शंतनू काकडे, प्रकाश टाकले, संभाजी खंदारे, पंजाब बोराडे, विष्णू फुफाटे, राजेश म्हस्के, अविनाश राठोड, नारायण काकडे, सतीश निर्वाळ, सुभाष राठोड, प्रकाश नानवते, कल्याण कदम, तुकाराम वैद्य यांच्यासह आदींची उपस्थिती होती.