पेयजल योजनेची कागदपत्रे गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 01:15 AM2019-05-10T01:15:37+5:302019-05-10T01:16:19+5:30

अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील ४३ लाखांची राष्ट्रीय पेयजल योजनेस दोन वर्ष लोटले आहेत. असे असतांना गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांची भटकंती सुरू आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यातच या योजनेचे पूर्ण रेकॉर्ड गायब असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Missing documents of drinking water scheme | पेयजल योजनेची कागदपत्रे गहाळ

पेयजल योजनेची कागदपत्रे गहाळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील ४३ लाखांची राष्ट्रीय पेयजल योजनेस दोन वर्ष लोटले आहेत. असे असतांना गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांची भटकंती सुरू आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यातच या योजनेचे पूर्ण रेकॉर्ड गायब असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
तालुक्यातील अंतरवाली सराटी गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यासाठी शासनाने ४३ लाखांची राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत स्वतंत्र विहिर गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीपर्यंत स्वतंत्र पाईपलाईन होती. ही दोन वर्षे झाली तरीही पाण्याच्या टाकीला मुख्य पाईपलाईन जोडल्या गेलीच नाही. त्यामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. योजनेचा संपूर्ण निधी खर्च करूनही या योजनेचा लाभ जनतेला न होता संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांना झालेला दिसतो. यातून शासनाच्या भ्रष्टाचारमुक्त कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत गावात लोखंडी व पीव्हीसी पाईपलाईन प्रत्येक गल्लीला स्वतंत्र करण्यात आली. तरीही गावात अनेक ठिकाणी पाणीपुरवठा होत नाही. पाण्याची ओरड कायम आहे. गावात पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात आलेल्या पाईपलाईनला विहिरीपासून सगळया गावात गळतीच - गळती होत आहे. पिण्यासाठी सोडलेले पाणी अर्ध्या गावात गळतीमुळे वाया जाते.पाईपलाईन गळतीमुळे मुख्य रस्त्याला गटाराचे स्वरूप प्राप्त होते. पाईपलाईनला लागलेली गळती काढली तर दोन दिवसही ते टीकत नाही, पुन्हा गळती लागते. गळती दुरुस्तीच्या नावाखाली ग्रामपंचायतकडून पैशाची उधळपट्टी होते आहे. परंतु गळती थांबलेली नाही. त्यामुळे ही योजना कुचकामी ठरली आहे. या योजनेची चौकशी झाल्यास बराच गोंधळ पुढे येऊ शकतो. परंतु हे करणार कोण, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Missing documents of drinking water scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.