आमदार-खासदारांना पेन्शन हवे कशाला ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:58 AM2018-10-28T00:58:47+5:302018-10-28T00:59:19+5:30
भारतात आजमितीला पन्नास कोटींवर अधिक कष्टकरी-कामकरी असून त्यांना कोणत्याही कामगार कायद्यान्वये संरक्षण उपलब्ध नाही. वृद्धांना पेन्शनची मागणी लाऊन धरली तर राज्यकर्ते म्हणतात. वृद्धांना कशाला हवे पेन्शन ? त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी मुला-बाळांचीच आहे. मग आमदार-खासदारांना तरी पेन्शन कशाला हवे ? असा रोकडा सवाल ज्येष्ठ कामगार नेते - विचारवंत डॉ. बाबा आढाव यांनी उपस्थित केला.
प्रा.डॉ. रावसाहेब ढवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भारतात आजमितीला पन्नास कोटींवर अधिक कष्टकरी-कामकरी असून त्यांना कोणत्याही कामगार कायद्यान्वये संरक्षण उपलब्ध नाही. वृद्धांना पेन्शनची मागणी लाऊन धरली तर राज्यकर्ते म्हणतात. वृद्धांना कशाला हवे पेन्शन ? त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी मुला-बाळांचीच आहे. मग आमदार-खासदारांना तरी पेन्शन कशाला हवे ? असा रोकडा सवाल ज्येष्ठ कामगार नेते - विचारवंत डॉ. बाबा आढाव यांनी उपस्थित केला.
जालना येथील मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजित ३५ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाला आज सायंकाळी डॉ. बाबा आढाव यांनी सदिच्छा भेट दिली. भारतीय संविधान आणि वर्तमान संदर्भ या परिसंवादाला प्रारंभ होण्यापूर्वी डॉ. बाबा आढाव यांना संयोजकांनी विनंती केल्याने त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कष्टकºयांच्या जाहीरनामा तयार करण्याच्या निमित्ताने डॉ. आढाव सध्या आपल्या साथीदारांसह मराठवाडा दौºयावर आलेले आहेत.
भारतीय संविधानावर सध्या अप्रत्यक्षपणे खूप हल्ले चालू असून, त्याविरूद्ध जनजागृती, संघटन आणि लढे उभारण्याची गरज प्रतिपादन करून डॉ. बाबा आढाव पुढे म्हणाले की, देशात व समाजात वाढत चाललेल्या विषमतेविरूद्ध लेखणी चालविण्याचे आव्हान साहित्यिकांपुढे आहे गरीब व श्रीमंतामधील अंतर केवळ शोषणामुळेच वाढत चाललले असून आर्थिक विषमता पराकोटीला जात आहे. तलाक, सबरीमाला प्रकरणासंदर्भाने सामाजिक विषयमतेचे अनेक पदर दिसू लागले असून जन-मनातील तसेच व्यवहारातील संघर्ष साहित्यिकांनी शब्दबद्ध केला पाहिजे.
म. फुले - सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांना ज्ञानरूपी तिसरा डोळा दिला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तर सर्वांना एकसारखा मताचा अधिकार दिला. त्याचा योग्य वापर होतो का, यासारखे विषय ऐरणीवर घेऊन विषमता व शोषणाचे अनेक पदर साहित्याद्वारे चित्रित करण्याचे काम लेख कवींना करावे लागेल. त्यासाठी कलात्मक सृजनशीलता, चिंतनशीलता जोपासून वर्तमान प्रश्नांना भिडते आणि टोकदार तेजोमय साहित्यनिर्मिती व्हावी, अशी अपेक्षाही डॉ. बाबा आढाव यांनी यावेळी व्यक्त केली.
सत्यमेव जयते हे आपले ब्रीद असून म. फुले यांनी सत्य सर्वांचे आघिर, सर्व धर्मांचे माहेर... ज्योती प्रार्थी सर्व लोका, व्यर्थ दंभा पेटू नका, ही रचना डॉ. बाबा आढाव यांनी शेवटी संमेलनानिमित्त सभागृहात उपस्थितांकडून सामुहिकरित्या म्हणून घेतली.