बोगस मतदानावरून भाजप आमदार नारायण कुचे आणि सेनेचे संतोष सांबरे यांच्यात बाचाबाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 04:39 PM2021-12-21T16:39:48+5:302021-12-21T16:41:58+5:30

BJP and Mahavikas Aghadi supporters Clashed: ज्ञानगंगा शाळा आणि मोसंबी संशोधन केंद्रातील मतदान केंद्रावर झाला प्रकार

MLA Narayan Kuche and Shiv Sena's Santosh Sambre clashed with supporters over bogus voting | बोगस मतदानावरून भाजप आमदार नारायण कुचे आणि सेनेचे संतोष सांबरे यांच्यात बाचाबाची

बोगस मतदानावरून भाजप आमदार नारायण कुचे आणि सेनेचे संतोष सांबरे यांच्यात बाचाबाची

googlenewsNext

बदनापूर ( जालना ) : शहरात नगरपंचायतच्या मतदाना प्रसंगी दोन ठिकाणी बोगस मतदार आक्षेपच्या कारणामुळे भाजप आणि महाविकास आघाडीच्या समर्थकांमध्ये बाचाबाची, हाणामारीचा प्रकार घडल्यामुळे या निवडणुकीला शेवटच्या दिवशी गालबोट लागलेले दिसले. एका घटनेत भाजपचे आमदार नारायण कुचे आणि महाविकास आघाडीचे माजी आमदार संरोष सांबरे यांच्या बाचाबाची झाल्याची माहिती आहे (MLA Narayan Kuche and Shiv Sena's Santosh Sambre clashed). 

शहरातील पहिला प्रकार ज्ञानगंगा शाळेतील केंद्रात  झाला. या ठिकाणी बोगस मतदार येत असल्याची माहिती मिळाल्यावरून भाजपा व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे राहिले. दरम्यान, आमदार नारायण कुचे व माजी आमदार संतोष सांबरे तेथे पोहोचले. दोघांमध्येही एकमेकांवर बोगस मतदानाचे आरोप करत जोरदार बाचाबाची झाली. 

तसेच दुसरी घटना जालना-औरंगाबाद महामार्गावरील मोसंबी संशोधन केंद्रातील मतदान केंद्रावर झाली. येथे महाविकास आघाडी व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बोगस मतदार येत असल्याच्या कारणावरून जोरदार बाचाबाची झाली. येथे माजी सरपंच तथा माजी नगरसेवक राजेंद्र जयस्वाल काँग्रेसचे शहराध्यक्ष मोबीन खान व अन्य पदाधिकारी तेथे गेले. त्यांनी कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता गर्दीतून अचानकपणे राजेंद्र जयस्वाल यांना मारहाण झाली. यामुळे जैस्वाल खाली पडले. त्यानंतर तेथे एकच गोंधळ उडाला. लागलीच पोलिसांनी हस्तक्षेप करत गर्दी पांगवली. 

बोगस मतदान रोखले
याविषयी आमदार नारायण कुचे म्हणाले की, विरोधी पक्षाने काही लोकांना हाताशी धरून बोगस मतदार आणण्याचा प्रयत्न केला आमच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदान रोखल्यामुळे बाचाबाची झाली.

विरोधक बिथरले आहेत 
माजी आमदार संतोष सांबरे म्हणाले की, शहरात महाविकास आघाडी झाल्यामुळे विरोधक बिथरले आहेत विरोधकांनी बोगस मतदार ग्रामीण भागातले मतदार येथे आणून मतदान करण्याचा प्रयत्न केला महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांन हा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला व त्यातून हा प्रकार घडला

मला मारहाण झाली 
माजी सरपंच माजी नगरसेवक राजेंद्र जयस्वाल म्हणाले की, तेथे बोगस मतदानावरून बाचाबाची सुरु झाली होती. हा प्रकार वाढू नये याकरिता मी तेथे जाऊन सोडवा सोडव करण्याचा प्रयत्न केला असता मला मारहाण करण्यात आली. या विषयी काँग्रेसचे शहराध्यक्ष मोबीन खान म्हणाले की, तेथे माझे भाऊ हे सुद्धा समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनाही मारहाण करण्यात आली. 

अद्याप कोणाचीही तक्रार नाही
त्याविषयी येथील पोलीस निरीक्षक शिवाजी बंडेवड म्हणाले की, तेथे बाचाबाची झाली असल्याचा प्रकार कानावर आला आहे. मात्र तेथे मारामारी झालेली नाही, तेथे उपस्थित असलेल्या आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून गर्दीला पांगवले. याविषयी अद्याप कोणाची तक्रार आलेली नाही.

Web Title: MLA Narayan Kuche and Shiv Sena's Santosh Sambre clashed with supporters over bogus voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.