सरकारचा निरोप घेऊन आमदार राजेंद्र राऊत अंतरवाली सराटीत; मनोज जरांगेंना म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 04:21 PM2024-07-18T16:21:03+5:302024-07-18T16:22:56+5:30

सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात मध्यस्थ असलेले बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत अंतरवाली सराटीत 

MLA Rajendra Raut is in Antarwali Sarati; giving government message to Manoj Jarange | सरकारचा निरोप घेऊन आमदार राजेंद्र राऊत अंतरवाली सराटीत; मनोज जरांगेंना म्हणाले...

सरकारचा निरोप घेऊन आमदार राजेंद्र राऊत अंतरवाली सराटीत; मनोज जरांगेंना म्हणाले...

- पवन पवार

वडीगोद्री ( जालना) : सरकार आणि मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांच्यात मध्यस्थी करत असलेले बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी आज दुपारी अंतरवालीत दाखल झाले. आ. राऊत आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा झाली. यावेळी तुम्ही पुन्हा उपोषणाला बसू नये, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचा निरोप आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगे यांना दिला. 

बुधवारी मनोज जरांगे यांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आज आ. राऊत यांनी जरांगेंची भेट घेतली. जरांगे पाटील यांचा माझ्या बाबत गैरसमज झालेला आहे. माझ्या पोटात इन्फेक्शन झाल्याने मी भेटीला आलो नाही. तसेच सभागृहात पण अधिवेशनावेळी मी एकच दिवस गेलो असं म्हणत राऊत यांनी जरांगे यांच्या टीकेवरस्पष्टीकरण दिल आहे.

दरम्यान, आमदार राजेंद्र राऊत आणि जरांगे पाटील यांच्यात चर्चा झाली. यावेळी आ. राऊत यांनी फोनवरून मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत संपर्क साधला. मात्र, जरांगे आणि शंभूराज देसाई यांची चर्चा होऊ शकली नाही. सरकारने किंवा सरकारच्या प्रतिनिधींनी छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन चर्चा करावी अशी मनोज जरांगे यांची इच्छा आहे. मात्र उद्या साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवकालीन वाघनख येणार असल्याने शंभूराज देसाई तिकडे व्यस्त आहेत. तर शनिवारी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार आहे त्यामुळे चर्चेला वेळ लागत आहे असे आमदार राजेंद्र राऊत म्हणाले.

उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. मी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. 
- आ. राजेंद्र राऊत 

Web Title: MLA Rajendra Raut is in Antarwali Sarati; giving government message to Manoj Jarange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.