मंठा गटविकास अधिकारी कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:53 PM2018-02-09T13:53:51+5:302018-02-09T13:57:46+5:30

मंठा तालुक्यात पाणीटंचाई असताना वारंवार मागणी करुनही त्याबाबत काहीच कारवाई झाली नाही. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज सकाळी गटविकास अधिका-यांच्या कार्यालयात तोडफोड केली. 

MNS workers disrupted Mantha block development office | मंठा गटविकास अधिकारी कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांची तोडफोड

मंठा गटविकास अधिकारी कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांची तोडफोड

googlenewsNext

जालना : मंठा तालुक्यात पाणीटंचाई असताना वारंवार मागणी करुनही त्याबाबत काहीच कारवाई झाली नाही. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज सकाळी गटविकास अधिका-यांच्या कार्यालयात तोडफोड केली. 

मंठा तालुक्यात यावर्षी मुबलक पाऊस झाला नाही. यामुळे येथे आताच पाणी टंचाई जाणवत आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनेचे जिल्हाध्यक्ष सिध्देश्वर काकडे यांनी दहा दिवसांपूर्वी गटविकास अधिका-यांना निवेदन देऊन तालुक्यातील पाणी टंचाईची समस्या सोडवण्याची मागणी केली होती. मात्र, यानंतरही यावर कसलीही कारवाई झाली नाही. या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच कार्यालयीन वेळेत येथे अधिकारी उपस्थित राहत नाहीत. याचा निषेध नोंदवत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली.

Web Title: MNS workers disrupted Mantha block development office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.