अपघातात मायलेक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 12:46 AM2018-03-02T00:46:00+5:302018-03-02T00:46:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भोकरदन : भरधाव काळीपिवळीने दोन दुचाकींना धडक दिल्याने मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर ...

Mother and son killed in an accident | अपघातात मायलेक ठार

अपघातात मायलेक ठार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : भरधाव काळीपिवळीने दोन दुचाकींना धडक दिल्याने मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना भोकरदन - जाफ्राबाद रोडवर विरेगावजवळ गुरुवारी दुपारी३.३० वाजता घडली़ रवींद्र साहेबराव पवार (२२) व कमल साहेबराव पवार (४५) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही वालसा वडाला येथील रहिवासी आहेत.
रवींद्र साहेबराव पवार (२२) व कमल साहेबराव पवार (४५) हे दोघे भोकरदनहून गावाकडे दुचाकीने (एमएच २० डी़पी ३६९५) येत होते. तर याच दरम्यान सिल्लोड येथून बाबरखान शकिल खान (२० रा़सिल्लोड), ताहेबर बागवान मन्नु (३४ रा़ औरंगाबाद) हे विना क्रंमाकाच्या दुचाकीवरुन धाड येथे जात होते. सैलानी घेऊन येणा-या काळी पिवळीवरील (एम २० बी ७०२१) चालकाचे नियंत्रण सुटले. त्याने या दोन्ही दुचाकींना जोरदार धडक दिली. यात रविंद्र साहेबराव पवार व कमल साहेबराव पवार हे दोघे जागीच ठार झाले. तर दुसºया दुचाकीवरील दोघे व काळी पिवळीतील रफीक बेन हैदर बेग (५२ रा सिल्लोड), सानिया शेख रफीक (४५), नय्युम खान निजामखान पठाण (४०रा़सिल्लोड) हे गंभीर जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. नागरिकांनी भोकरदन ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. डॉ अमोल मुळे, डॉ अजय देशमुख यांनी प्राथमिक उपचार करून दोघांना घाटी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. भोकरदन पोलिसात काळी पिवळी चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली.
वालसा वडाळा या गावात होळीच्या सणाच्या दिवशीच पवार कुटुंबातील आई व मुलगा यांचा अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. या गावात होळी पेटली नाही. मात्र कमलबाई व रवींद्र पवार या आई व मुलाची रात्री ७ वाजता चिंता रचण्यात आली होती. यावेळी शोकाकुल वातावरणात अंत्यसस्कार करण्यात आले़

Web Title: Mother and son killed in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.