आई सोडूनी मजला, कोठे गेली, टाहो फोडू लागला श्याम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:25 AM2020-12-25T04:25:09+5:302020-12-25T04:25:09+5:30

-ह.भ.प. प्रणव जोशी जालना : आईसारखे दुसरे दैवत नाही, आईच आपल्यावर संस्कार करते. जसे श्यामची आई श्यामवर संस्कार करते, ...

Mother left the floor, where did she go, Taho started bursting Shyam! | आई सोडूनी मजला, कोठे गेली, टाहो फोडू लागला श्याम!

आई सोडूनी मजला, कोठे गेली, टाहो फोडू लागला श्याम!

Next

-ह.भ.प. प्रणव जोशी

जालना : आईसारखे दुसरे दैवत नाही, आईच आपल्यावर संस्कार करते. जसे श्यामची आई श्यामवर संस्कार करते, त्याचप्रमाणे आपली आई आपल्यावर संस्कार करते. म्हणूनच म्हटले आहे की, आई सोडूनी मजला, कोठे गेली, टाहो फोडू लागला श्याम, असे प्रतिपादन ह.भ.प. प्रणव जोशी यांनी येथे बोलताना केले.

येथील संस्कार प्रबोधिनी विद्यालयात साने गुरुजी जयंतीनिमित्त ऑनलाईन कीर्तनरूपी मार्गदर्शनात प्रणव जोशी बोलत होते. प्रारंभी साने गुरुजी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळेतील शिक्षक किरण धुळे, रशिद तडवी, रेखा हिवाळे, दीपाली पवार आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन उपक्रमशील शिक्षक रामदास कुलकर्णी यांनी केले होते. पुढे बोलताना ह.भ.प. प्रणव जोशी म्हणाले की, जसं श्याम स्नान केल्यानंतर पायाला घाण लागू नये म्हणून आईला जमिनीवर धोतर टाकायला लावतो. तेव्हा श्यामची आई श्यामला सांगते, जसे पायाला घाण लागू नये जपतोस, तसेच मनाला घाण लागू नये म्हणून जपावे! आठवली जिजाई माता करी अपार मजवरी, ममता मुखी शब्द नृपच्या येई माते सम दैवत नाही, ज्याप्रमाणे जिजामातेने बाल शिवाजीवर संस्कार केले, त्याचप्रमाणे प्रत्येक माता आपल्या मुलांवर संस्कार करते. अशाच प्रमाणे श्यामच्या आईनेही श्यामवर संस्कार केले. मरावे परी कीर्तिरूपी उरावे, आपण जे कार्य करतो ते कार्य अतिशय चांगल्या प्रकारचे असावे. म्हणजे व्यक्ती गेल्यानंतरही त्याची कीर्ती पाठीमागे राहते. असेच चांगले संस्कार अंगिकारले पाहिजेत, असे प्रतिपादन ह.भ.प. जोशी यांनी केले. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी, सचिव विजय देशमुख, प्रा. राम भाले, विनायक देशपांडे, रंजित ठाकूर, प्रा. बगेरिया, भास्कर काळे आदींनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले.

Web Title: Mother left the floor, where did she go, Taho started bursting Shyam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.