राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:28 AM2021-05-15T04:28:46+5:302021-05-15T04:28:46+5:30
अंबड - मार्डी रस्त्याची दुरवस्था अंबड : येथील अंबड - मार्डी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर ...
अंबड - मार्डी रस्त्याची दुरवस्था
अंबड : येथील अंबड - मार्डी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर खडी टाकून ठेवली होती. मात्र, खडीकरण झाल्यानंतर पुढे त्यावर डांबरीकरण झालेच नाही. सध्या रस्त्यावर टाकलेली खडी अस्ताव्यस्त पसरत आहे. यामुळे दुचाकी वाहन चालकांची कसरत होत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी सरपंच प्रकाश मुंजाळ, ओमप्रकाश राऊत, केदार राऊत, राजेंद्र भडक आदींनी केली आहे.
हिवरखेडा येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
मंठा : हिवरखेडा येथे आत्मा व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने बुधवारी दहा टक्के रासायनिक खताचा वापर कमी करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. माती परीक्षण महत्व, जमीन सुपीकता निर्देशांकानुसार द्यावयाच्या रासायनिक खत मात्रा याविषयी सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक रोहन कोहिरे व आर. एम. मोहाडे यांनी माहिती दिली.
वरूडाला ५० खाटांचे विलगीकरण कक्ष
वरूड ब्रुद्रुक : जाफराबाद तालुुक्यातील वरूड बुद्रुक येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड यांच्या पुढाकाराने कोरोना रुग्णांसाठी ५० खाटांचे विलगीकरण कक्ष केंद्र सुरू करण्यात आले आहे. न्यू हायस्कूलमधील या केंद्राचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी जि. प. उत्तम वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, रमेश गव्हाड आदींची उपस्थिती होती.
रासायनिक खत बचतीची मोहीम
परतूर : रासायनिक खताचा संतुलित वापर, तसेच खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना शेतीविषयी अडचणी व उपाय याबाबत तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत तालुक्यातील वरफळ व वरफळवाडी येथे थेट बांधावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी डाॅ. एस. एन. पवळ, मंडल अधिकारी ए. एच. माने, कृषी पर्यवेक्षक डुकरे यांच्या मार्गदर्शन लाभल्याची माहिती कृषी सहायक मीरा ढाकरे व आत्माचे सचिन राठोड यांनी दिली.