पाणी सोडण्यासाठी जलसमाधी जनआंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:50 AM2019-05-26T00:50:09+5:302019-05-26T00:51:15+5:30
पैठण येथील नाथ जलाशयातून तीर्थपुरी परिसरातील डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी शेतकऱ्यांनी जोगलादेवी बंधा-यात उतरुन जलसमाधी आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तीर्थपुरी : पैठण येथील नाथ जलाशयातून तीर्थपुरी परिसरातील डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी शेतकऱ्यांनी जोगलादेवी बंधा-यात उतरुन जलसमाधी आंदोलन केले. यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली होती.
परिसरात पर्जन्यमान कमी झाल्याने परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी, नाल्यांना पाणीच नसल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. परिणामी फळबाग आणि उसाचे पीक जागेवर वाळून जात आहेत. सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. याबाबत वारंवार प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे संतप्त २५ शेतकऱ्यांनी जोगलादेवी बंधाºयात उतरून जलसमाधी आंदोलन करुन पाणी सोडण्याची मागणी केली.
यावेळी सर्जेराव जाधव, कैलास शेळके, रमेश काळे, रामेश्वर सानप, भास्कर पांढरे, बाळासाहेब बहीर, विलास चव्हाण, गणेश मेगडे, अर्जुन माळोदे, गणेश मोटे, प्रकाश गहिरे, माऊली धाडंगे अर्जुन थेटे, प्रकाश म्हस्के, बबन शिंदे, बाबासाहेब बाशिंगे, भरत बोबडे, राहुल चिमणे, सीताराम खोजे, विनोद खोजे, भरत खोजे, भागवत सागडे, कांताराव वराडे, योगेश ढोणे, विलास मुकणे, बापू ढेरे, विकास मुकणे, बप्पा देवडे, नारायण अडाणी उपस्थित होते.
लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
दोन दिवसात पाणी सोडण्यात येईल, असे लेखी आश्वासन तहसीलदार, मंडळाधिका-यांनी शेतक-यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. गेल्या दोन महिन्यांपासून या मागणीसाठी ग्रामस्थांकडून पाठपुरावा केला जात होता. मध्यंतरी कडा प्रशासनाच्या अधिका-यांना कोंडण्याचा प्रयत्नही संतप्त ग्रामस्थानी केला होता.