पाणी न सोडण्यासाठी जलसमाधी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:08 AM2019-05-11T00:08:01+5:302019-05-11T00:08:27+5:30
मंठा, परतूर, सेलू या तिन्ही तालुक्यांमध्ये असलेल्या निम्न दुधना प्रकल्पातून १५ मे पासून पाणी सोडण्यात येणार होते. परंतु हे पाणी सोडू नये म्हणून शुक्रवारी चार युवकांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंठा : मंठा, परतूर, सेलू या तिन्ही तालुक्यांमध्ये असलेल्या निम्न दुधना प्रकल्पातून १५ मे पासून पाणी सोडण्यात येणार होते. परंतु हे पाणी सोडू नये म्हणून शुक्रवारी चार युवकांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.
निम्न दुधना प्रकल्पात सध्या मृत पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातून जर नदीपात्रातून परभणी जिल्ह्यात पाणी सोडल्यास त्याचा मोठा अपव्यय होणार आहे. तो थांबविण्यासाठी हे जलसमाधीचे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पाणी सोडू नये म्हणून मंठा - परतूर तालुका पुनर्वसन समिती तसेच जि. प. सदस्य पंजाब बोराडे यांनी जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची भेट घेऊन निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी सोडल्यास जलसमाधी घेऊ, असा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर ९ मे रोजी काँग्रेस- राष्ट्रवादीने आंदोलन छेडले होते.
या पेटलेल्या पाणीप्रश्नावर शुक्रवारी प्रशासनाची भंबेरी उडाली. आंदोलनातील जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव बोराडे, राजेश मोरे, विष्णू कवळे, संतोष कवळे, राजेभाऊ खराबे हे जलसमाधी घेण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पाच्या पाण्यात उतरले असता एकच खळबळ उडाली होती.
यावेळी सांगितले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भुजंग गोरे, सभापती संदीप गोरे, नगराध्यक्ष विनोद बोराडे, गणेश खवणे भारत बोराडे, नागेश घारे, नाथा काकडे, गुलाब लाटे यांच्यासह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.
दरम्यान पालकमंत्री बबन लोणीकर यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
या प्रकरणी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी लक्ष घालून आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याशी तातडीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली.
आणि पाणी सोडण्याची अफवा असल्याचे सांगितल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.