वीजचोरीकडे महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:30 AM2021-03-05T04:30:37+5:302021-03-05T04:30:37+5:30
अंबड : विस्कळीत वीजपुरवठ्यासह इतर विविध कारणांनी महावितरणला सतत ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यात सध्या थकीत वीज बिलाची ...
अंबड : विस्कळीत वीजपुरवठ्यासह इतर विविध कारणांनी महावितरणला सतत ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यात सध्या थकीत वीज बिलाची सक्तीने वसुली सुरू आहे. तर दुसरीकडे शहरी, ग्रामीण भागात असंख्य नागरिक आकडे टाकून वीज वापरत असून, ही वीजचोरी रोखण्याकडे मात्र, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कानाडोळा होत आहे.
कधी रोहित्र जळणे, कधी तांत्रि समस्या निर्माण होण्यामुळे ग्राहकांना भारनियमनाचा सामना करावा लागतो. याचा फटका घरगुती वीज ग्राहकांसह उद्योग, शेतकरी व्यवसायालाही बसत आहे. त्यात गत काही दिवसांपासून महावितरणकडून थकीत वीजबिल वसुलीची मोहीम जोमात सुरू आहे. त्यासाठी शेतीचा वीजपुरवठा खंडितही करण्यात आला होता. परंतु, सक्तीची वीज बिल वसुली मोहीम राबविणाऱ्या या महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वीज चोरांकडे साफ दुर्लक्ष होत आहे. अनेकजण चोरून वीज वापरत असून, याचा अधिभार नियमित वीज भरणाऱ्या ग्राहकांना सहन करावा लागत आहे. अंबड शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात चोरून वीज वापरली जात आहे. ही बाब पाहता महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विशेष पथके तयार करून वीज चोरणाऱ्यांविरूध्द धडक कारवाई करण्याची गरज आहे.
कोट
सध्या उन्हाळ्याचेेे दिवस सुरू असून, पिकाला पाणी देणे गरजचे आहे. शिवाय भारनियमनामुळे वेळी -अवेळी पाणी देण्याचे काम करावे लागते. विजेचा लपंडाव ही सुद्धा नित्याचीच बाब झालेली आहे. याचा फटका शेती व्यवसायाला बसत आहेण
भिकाजी भोजने, शेतकरी मार्डी