उपोषणाकडे पालिका प्रशासनाची पाठ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:48 AM2018-07-09T00:48:54+5:302018-07-09T00:50:15+5:30
शहरातील सर्वे १७१ मधील भूखंडातील १ ते १० चे वाढीव क्षेत्राबाबत मंजूर झालेले सुधारित अभिन्यास तातडीने रद्द करण्यात यावे या व अन्य मागण्यासाठी महेश महाजन यांनी गुुरुवारपासून नगर पालिकेसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील सर्वे १७१ मधील भूखंडातील १ ते १० चे वाढीव क्षेत्राबाबत मंजूर झालेले सुधारित अभिन्यास तातडीने रद्द करण्यात यावे या व अन्य मागण्यासाठी महेश महाजन यांनी गुुरुवारपासून नगर पालिकेसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
चार दिवस होऊनही पालिका प्रशासनाने उपोषणार्थींची कसलीही दखल न घेतल्याने उपोषणकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
यासंदर्भात जालना नगर पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात महाजन यांनी म्हटले आहे की, शहरातील भोकरदन नाका ते मोंढा रस्त्यावरील वरकड हॉस्पीटल लगत असलेल्या सर्वे क्रमांक १७१ मधील १ ते १० या भूखंडसमोरुन पूर्वी १५ फूटाचा पर्यायी रस्ता होता. मात्र सदरचा पर्यायी रस्ता बांधकाम विभागाने नगर पालिकेकडे हस्तांरीत केल्यानंतर सदर रस्त्याची जागा ही भूखंडधारकास विक्री करणे बंधनकारक असतांनाही असे करण्यात आली नाही. या अन्याया यासंदर्भात गेल्या दोन वषार्पासून नगर पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या, माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहितीही मागवली ती दिली गेली नाही, यामुळे आपण उपोषणाचा मार्ग स्विकारला असल्याचे महाजन यांनी सांगितले.
या प्रकरणाकडे जिल्हाधिका-यांनी लक्ष देऊन संबंधीत विभागांना सूचना देण्याची मागणी महाजन यांनी केली. पर्यायी रस्ता ज्या भागातून जात आहे. त्या भागात एका राजकीय पक्षाशी निगडीत व्यक्तीचा भूखंड असल्याने याकडे सोयीचे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी सांगितले.