आधी दगडाने ठेचून खून, नंतर जाळण्याचा प्रयत्न;बेपत्ता चालकाचा दोन दिवसांनी आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 01:53 PM2022-03-19T13:53:20+5:302022-03-19T13:53:49+5:30

प्रथम दगडाने ठेचून खून करण्यात आला. त्यानंतर ओळख पटू नये म्हणून शेतातील तुऱ्हाठ्यात मृतदेह पेटवून देण्याचा मारेकऱ्यांचा प्रयत्न असावा.

Murder by stoning first, then attempted burn; body of missing driver found two days later | आधी दगडाने ठेचून खून, नंतर जाळण्याचा प्रयत्न;बेपत्ता चालकाचा दोन दिवसांनी आढळला मृतदेह

आधी दगडाने ठेचून खून, नंतर जाळण्याचा प्रयत्न;बेपत्ता चालकाचा दोन दिवसांनी आढळला मृतदेह

googlenewsNext

- फकीरा देशमुख
भोकरदन ( जालना ) : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका २३ वर्षीय चालकाचा शेतात वाळलेल्या गवताखाली लपवलेला मृतदेह आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास भोकरदन- जालना रोडवरील सोयगाव देवी पाटीच्या जवळ शेतात आढळून आला. भगवान राजू तळेकर असे मृत चालकाचे नाव आहे. मारेकऱ्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वाळलेल्या तुऱ्हाठ्यात मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज आहे. 

शहरातील उस्मानपेठे परिसरातील भगवान राजू तळेकर हा ट्रक चालक आहे. मागील दोन दिवसांपासून तो बेपत्ता होता. दरम्यान, आज सकाळी ९ गट क्रमांक 177 मधील शेतात तुऱ्हाठया खाली एका तरुणाचा मृतदेह असल्याचे शेतकरी बाजीराव साबळे यांना आढळून आले. त्यांनी भोकरदन पोलीस ठाण्याचे सपोनि रत्नदीप जोगदंड यांना याची माहिती दिली.  त्यानंतर सपोनि जोगदंड, सपोनि राजाराम तडवी, पोलिस उपनिरीक्षक सचिन कापुरे, गणेश पायघन यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी आधारकार्ड सापडल्याने मृतदेह भगवान तळेकर याचा असल्याचे स्पष्ट झाले. 

आधी दगडाने ठेचून खून 
दरम्यान, भगवान दोन दिवसांपासून घरी आलेला नव्हता असे त्याच्या आई-वडिलांनी सांगितले. भगवानचा प्रथम दगडाने ठेचून खून करण्यात आला. त्यानंतर ओळख पटू नये म्हणून शेतातील तुऱ्हाठ्यात मृतदेह पेटवून देण्याचा मारेकऱ्यांचा प्रयत्न असावा. मात्र, कोणाची तरी चाहूल लागल्याने मारेकऱ्यांनी तेथून काढता पाय घेतल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.    

Web Title: Murder by stoning first, then attempted burn; body of missing driver found two days later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.