मृतदेह आढळण्याची मालिकाच; ११ दिवसांत आढळलेल्या ६ मृतदेहांच्या घटनांचा अद्याप उलगडा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 04:59 PM2021-10-13T16:59:46+5:302021-10-13T17:13:17+5:30

Crime News in Jalana मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मृतदेह आढळण्याची मालिकाच सुरू झाली आहे.

Murder or suicide? Sensation as 6 bodies were found in Jalna in 11 days | मृतदेह आढळण्याची मालिकाच; ११ दिवसांत आढळलेल्या ६ मृतदेहांच्या घटनांचा अद्याप उलगडा नाही

मृतदेह आढळण्याची मालिकाच; ११ दिवसांत आढळलेल्या ६ मृतदेहांच्या घटनांचा अद्याप उलगडा नाही

Next
ठळक मुद्देमृत्युच्या कारणांचा उलगडा अद्याप नाहीवाढत्या गुन्हेगारीला रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान

- दीपक ढोले  
जालना : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहेत. वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे. असे असतानाच जिल्ह्यात गेल्या ११ दिवसांत तब्बल ६ जणांचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत  अकस्मात मृत्यूची ( Crime In Jalana ) नोंद करण्यात आली आहेत.   

जालना जिल्ह्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाढत्या विस्ताराबरोबरच गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहेत. वाढत्या गुन्हेगारीला रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. चोरीच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ झाली असून, गुन्हेगारीत जालना जिल्हा मराठवाड्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचे पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी नुकतेच सांगितले होते. जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी  प्रयत्न करीत आहेत. 

त्यातच मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मृतदेह आढळण्याची मालिकाच सुरू झाली आहे. एक ऑक्टोबरपासून जिल्ह्यात तब्बल सहा जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. यात बदनापूर व जालना शहरात सर्वाधिक मृतदेह आढळून आले आहेत. बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तर  सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन मृतदेह आढळून आले आहेत.  पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  परंतु, त्यांच्या मृत्यूची कारणे अद्यापही स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे त्यांची हत्या की, आत्महत्या  याचा तपास होणे गरजेचे आहे.   

तपासाला गती मिळणे गरजेचे 
यातील काहीजण बेपत्ता होते. त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. विशेष म्हणजे, काहींना आत्महत्या केल्यासारखे दाखविण्यात आले आहे.  या सहा जणांचा मृत्यू कशामुळे झाला,  हे शोधणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील क्रमवार घटना : 
१ ऑक्टोबर रोजी कुंडलिका नदीपात्रात मुकुंद पांडे यांचा मृतदेह आढळला. (सदर बाजार पोलीस ठाणे) 
४ ऑक्टोबर रोजी आन्वा येथे १५ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला. (पारध)  
४ ऑक्टोबर रोजीच नवीन मोंढा भागात गणेश घायाळ यांचा मृतदेह आढळला. (सदर बाजार)
८ ऑक्टोबर रोजी १३ दिवसांपासून बेपत्ता असलेला तरूण ऋषिकेश कोळकर याचा मृतदेह आढळला. (बदनापूर)
९ ऑक्टोबर रोजी कुंडलिका नदीपात्रात ४० वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळला. (सदर बाजार)
११ ऑक्टोबर रोजी बदनापूर तालुक्यातील सागरवाडी येथे शेख नदीम या युवकाचा मृतदेह आढळला. (बदनापूर) 

लवकरच उलगडा होईल
जिल्ह्यात सहा मृतदेह आढळून आले आहेत. या सर्व प्रकरणांचा तपास सुरू आहे. लवकरच त्याचा उलगडा केला जाईल. परंतु, या सर्व आत्महत्या असल्याचा आमचा अंदाज आहे. बदनापूर येथील तरूणाने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.    
- विनायक देशमुख, पोलीस अधीक्षक

प्रा. राजन शिंदे यांचा मारेकरी कोण ? कुटुंबातील सदस्यांचे चौकशीत पोलिसांना असहकार्य

Web Title: Murder or suicide? Sensation as 6 bodies were found in Jalna in 11 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.