मिल्लतनगरात तरुणाचा खून ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:43 AM2018-02-22T00:43:14+5:302018-02-22T00:43:17+5:30
जुना जालन्यातील मिल्लतनगर भागातील एका नाल्यात गुरुवारी सकाळी इमरान नजीर बेग (२७, रा. मिल्लतनगर) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर गंभीर जखमा असल्यामुळे हा घातपात असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जुना जालन्यातील मिल्लतनगर भागातील एका नाल्यात गुरुवारी सकाळी इमरान नजीर बेग (२७, रा. मिल्लतनगर) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर गंभीर जखमा असल्यामुळे हा घातपात असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.
पोलीस सूत्रांनी सांगितले, की मिल्लतनगर भागातील एका गोदामाच्या मागे नाल्यामध्ये एक जण पडल्याचे काही जणांनी पाहिले. संशय आल्याने स्थानिकांनी याबाबत कदीम जालना पोलिसांना माहिती दिली. कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस नरीक्षक बालासाहेब पवार, उपनिरीक्षक शेजूळे हे घनास्थळी पोहचले. पोलिसांनी पंचनामा करून नाल्यातील व्यक्तीला बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. येथे डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. या प्रकाराची माहिती परिसरत वा-यासारखी पसरली. त्यानंतर काही स्थानिक जिल्हा रुग्णालात पोहोचल्यानंतर सदर व्यक्ती इमरान बेग असल्याचे काहींनी सांगितले. इमरान बेग यांच्या शरिरावर ठिकठिकाणी जखमा आढळून आल्या. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दरम्यान, हा घातपाताचा संशय असल्याचा आरोप करत नातेवाइकांनी केला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रात्री उशिरा कदीम पोलीस ठाण्यात नातेवाइकांनी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, असे उपनिरीक्षक शेजूळ यांनी सांगितले.