‘माझी राखी, वीर सैनिकांसाठी’; विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या स्वहस्ते बनविलेल्या राख्या

By शिवाजी कदम | Published: August 28, 2023 06:18 PM2023-08-28T18:18:41+5:302023-08-28T18:19:29+5:30

जीवनराव पारे विद्यालयातील विद्यार्थिनींचा उपक्रम

'My Rakhi, for the brave soldiers'; Handcrafted rakhis sent by the students to the jawans | ‘माझी राखी, वीर सैनिकांसाठी’; विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या स्वहस्ते बनविलेल्या राख्या

‘माझी राखी, वीर सैनिकांसाठी’; विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या स्वहस्ते बनविलेल्या राख्या

googlenewsNext

चंदनझिरा: येथील जीवनराव पारे विद्यालयातील विद्यार्थिनींनी ‘माझी एक राखी वीर सैनिकांसाठी’ उपक्रमात उत्साहात सहभाग घेतला. वीर जवान आपल्या रक्षणासाठी रात्रंदिवस सीमेवर पहारा देतात, त्यामुळे आपण घरात सुरक्षितपणे विविध सण समारंभ साजरे करू शकतो. 

सैनिकाप्रती आपली जाणीव ठेवून जीवनराव पारे विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वतः राखी तयार करून त्या जवांनाकडे पाठवल्या आहेत. या उपक्रमाचे संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक, कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वीर सैनिकांसाठी व देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळावी या उद्देश हा उपक्रम घेण्यात आला आहे. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष पारे यांनी मार्गदर्शन केल्याचे राजनंदिनी आदमाने या विद्यार्थिंनीने सांगितले.

Web Title: 'My Rakhi, for the brave soldiers'; Handcrafted rakhis sent by the students to the jawans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.