जालना, बदनापुरात राकाँची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 01:02 AM2019-09-26T01:02:23+5:302019-09-26T01:03:56+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जालना आणि बदनापूर येथे निदर्शने केली.

Nakana demonstrations at Jalna, Badnapur | जालना, बदनापुरात राकाँची निदर्शने

जालना, बदनापुरात राकाँची निदर्शने

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना / बदनापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरूध्द ईडीने गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईचा निषेध नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जालना आणि बदनापूर येथे निदर्शने केली.
जालना शहरातील गांधी चमन परिसरात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
यामुळे दुपारी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अचानक केलेल्या आंदोलनामुळे पोलीसही गोंधळून गेले होते.
या आंदोलनात माजी आ. अरविंद चव्हाण, माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष सुरेश खंडागळे यांच्यासह कैलास मदन, बाळासाहेब वाकुळणीकर, अश्विनी गायकवाड, अरूण पैठणे, राम सिरसाठ, दादाराव साळवे, सनी रगडे, इकबाल शेख, अदनान सौदागर, फिरोजखान पठाण आदींचा सहभाग होता.
आंदोलनकर्त्यांविरूध्द पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरूध्द ईडीने जो गुन्हा दाखल केला आहे,तो सूडभावनेतून केला आहे. एकूणच शरद पवार हे कुठल्याही बँकेचे संचालक नसताना त्यांच्यावर कुठल्या आधारे गुन्हा दाखल केला,याचा खुलासा सरकारकडून अद्याप झालेला नाही.
शरद पवार हे या गुन्ह्यामुळे घाबरून गेले नसून, उलट ते स्वत: २७ तारखेला मुंबईच्या ईडी कार्यालयात हजर होणार आहेत. यावरून त्यांच्याविरूध्द दाखल झालेला गुन्हा किती तकलादू आहे, हे स्पष्ट होते, असे माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.

Web Title: Nakana demonstrations at Jalna, Badnapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.