वादविवाद स्पर्धेत नांदेडचे यशवंत महाविद्यालय विजेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:29 AM2018-01-19T00:29:36+5:302018-01-19T00:30:10+5:30
मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अंकुशराव टोपे महाविद्यालयात आयोजित कै. रावसाहेब टोपे आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत सांघिक विजेतेपदाचे प्रथम पारितोषिक नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाने मिळविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अंकुशराव टोपे महाविद्यालयात आयोजित कै. रावसाहेब टोपे आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत सांघिक विजेतेपदाचे प्रथम पारितोषिक नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाने मिळविले.
बलभीम महाविद्यालय, बीड येथील राहुल गिरी, द्वितीय क्रमांक जयप्रकाश नारायण अध्यापक महाविद्यालय औरंगाबाद येथील भरत रिडलॉन तर तृतीय क्रमांकाचे स्मृतिचिन्ह मत्स्योदरी महाविद्यालय अंबड येथील शेख अहमेद साहेल शौकत याने पटकावले.
या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. शिवाजी मदन यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डॉ.बी.आर. गायकवाड हे होते. यावेळी डॉ. शिवाजी मदन यांनी शिक्षण हा तिसरा डोळा असून, शिक्षणातून मनशुद्धी करून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात डॉ. राजेंद्र गायकवाड यांनी स्पर्धेची भूमिका विशद केली. अध्यक्षीय समारोप डॉ. बी.आर. गायकवाड यांनी केला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण अजिंक्य टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. बिराजदार, प्राचार्य डॉ. राजेंद्र गायकवाड, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील यांची उपस्थिती होती. या स्पर्धेत ९ महाविद्यालयांतील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यावेळी डॉ. राम रौनेकर, डॉ. रामनाथ सांगुळे, डॉ. व्ही.टी. काळे, डॉ. श्रीपाद गायकवाड, प्रा. कृष्णा बनसोडे, प्रा. गादगे आदींची उपस्थिती होती.