महाकाळा गावात राष्ट्रवादी काँग्रेसने गड राखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:28 AM2021-01-21T04:28:34+5:302021-01-21T04:28:34+5:30
महाकाळा ग्रामपंचायत १७ सदस्यीय असून, येथे एक उमेदवार बिनविरोध निवडून आला, तर प्रत्यक्ष १६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १५ उमेदवार ...
महाकाळा ग्रामपंचायत १७ सदस्यीय असून, येथे एक उमेदवार बिनविरोध निवडून आला, तर प्रत्यक्ष १६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १५ उमेदवार राष्ट्रवादीचे, तर एक उमेदवार शिवसेनेचा निवडून आला आहे. विजयी उमेदवारांमध्ये लताबाई चिमणे, विकास कव्हळे, सविता लहाने, ऊर्मिला सपकाळ, संध्या नरवडे, रुख्मीण फुलझळके, वैजयंती लिमकर, आसराबाई जाधव, विष्णू सराटे, रत्नमाला खंडागळे, ज्ञानेश्वर शिंदे, रोहिणी वनवे, सोनाली यशवंते, राजेंद्र रायमल, दत्तात्रय गर्जे, तर शिवसेनेकडून ज्ञानेश्वर मुळे विजयी झाले. सुधाकर चिमणे हे याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत.
चुर्मापुरी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट समोरासमोर निवडणुकीला सामोरे गेले. मागील दहा वर्षांपासून दिनेश लोणे व अजय रसाळ यांच्या गटाच्या ताब्यात ग्रामपंचायत होती. परंतु, यावेळेस ९ जागांपैकी रसाळ - लोणे गटाला ४ जागांवर जनतेने कौल दिला. भैय्यासाहेब हातोटे गटाचा ५ जागांवर विजय झाल्याने येथे खांदेपालट झाल्याचे दिसून आले. यामध्ये भैय्या हातोटे गटामधील साधना हातोटे, अख्तर शेख, शारदा लोणे, भैय्या लोणे, मुक्ता शिंदे निवडून आले. रसाळ गटाचे वर्षा लोणे, रूख्मीण रसाळ, रेणुका फटांगडे, संदीप गाडेकर निवडून आले आहेत.