इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा सायकल मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:56 AM2018-05-29T00:56:43+5:302018-05-29T00:56:43+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पेट्रोल-डिझेल इंधन दरवाढी विरोधात रविवारी तहसील कार्यालयावर सायकल मोर्चा काढण्यात आला.

NCP's Cycle rally Against Fuel pricehike | इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा सायकल मोर्चा

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा सायकल मोर्चा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : केंद्र व राज्यात लबाडांचे सरकार असून, या सरकारच्या काळात समाजातील कोणताही घटक समाधानी नसल्याची टीका माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी अंबड येथे केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पेट्रोल-डिझेल इंधन दरवाढी विरोधात रविवारी येथील तहसील कार्यालयावर सायकल मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते.
आ.टोपे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढलेले नसताना आपल्या देशात इंधनाचे दर का वाढले आहेत. वास्तविक ३५ रुपये लिटरने मिळू शकणारे पेट्रोल ८५ रुपये लिटरने विकत घ्यावे लागत आहे. सरकारने इंधनावर तब्बल ६६ टक्के कर लावला आहे. त्यामुळे दुप्पट किमतीने इंधन खरेदी करावे लागत आहे. पंतप्रधान मोदी यांनी जनतेला आश्वासन देताना महागाई कमी करतो, शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावात दीड पट वाढ करु, मेक इन इंडियाच्या माध्यमातून उद्योग आणू, नवीन उद्योग उभारु, रोजगार निर्मिती करू, अशी आश्वासने दिली होती. मात्र शेतकरी, नोकरदार, उद्योजक, विद्यार्थी, कामगार सर्वच घटकांमध्ये या केंद्र व राज्य सरकारविषयी नाराजी आहे. भाजपा सरकार शेतकरी विरोधी आहे. भाजपाच्या सरकारच्या काळात धार्मिक व जातीय विव्देष वाढला असून, अल्पसंख्याक जनतेच्या मनात भीतीचे वातावरण आहे. जनतेचा आक्रोश सरकारला ऐकवण्यासाठी मोर्चा काढण्यात आल्याचे ते म्हणाले.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड, जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती रघुनाथ तौर, बबलु चौधरी, प. स. उपसभापती बाळासाहेब नरवडे, समद बागवान, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अफरोज पठाण, गटनेते शिवप्रसाद चांगले, अल्पसंख्याक प्रदेश सचिव समद बागवान, बाजार समिती सभापती सतीश होंडे, खरेदी-विक्री संघ चेअरमन भाऊसाहेब कनके, जि. प. सदस्य विष्णूपंत गायकवाड, राजन उढाण, चंद्रमणी खरात, अर्जुन भोजने, संतोष सोमाणी, तकी सिद्दीकी, विक्रम राजपूत, दीपक कुरेवाड, पंकज मणियार, प्रभाकर डोखळे, मनोहर जामदरे, नंदकुमार गायकवाड, श्रीकृष्ण तारख, डॉ योगेश ढेंबरे, जालिंदर बाबर, भरत रत्नपारखे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Web Title: NCP's Cycle rally Against Fuel pricehike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.