वीज भारनियमनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:48 AM2018-10-14T00:48:32+5:302018-10-14T00:49:40+5:30

वीज वितरण कंपनीने तालुक्यात सुरू केलेल्या भारनियमनामुळे शेतकऱ्यासह सर्व सामान्य नागरिक त्रस्त आहे. भारनियमन बंद करण्याच्या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वीजवितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढून भारनियमन बंद करण्याची मागणी मोर्चेकºयांनी केली.

NCP's Front Against Electricity Ordinance | वीज भारनियमनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा

वीज भारनियमनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा

Next
ठळक मुद्दे्रपरतूर : तालुक्यातील भारनियमन बंद करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : वीज वितरण कंपनीने तालुक्यात सुरू केलेल्या भारनियमनामुळे शेतकऱ्यासह सर्व सामान्य नागरिक त्रस्त आहे. भारनियमन बंद करण्याच्या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वीजवितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढून भारनियमन बंद करण्याची मागणी मोर्चेकºयांनी केली.
या मोर्चाचे नेतृत्व सभापती कपिल आकात यांनी केले. यावेळी तालूकाध्यक्ष रमेश सोळंके, कुणाल आकात,जि. प. सदस्य शिवाजीराव सवने, माजी सरपंच ज्ञानेश्वर बिडवे, नगरसेवक अकिल काजी, विजय राखे, महेश नळगे, जमिल कुरेशी, सरंपच शत्रुग्न कणसे, समता परीषदेचे मधूकर झरेकर हे होते. याप्रंसगी तालुकाध्यक्ष रमेश सोळंके म्हणाले की, या शासनाने दिलेली अश्वासने पाळली नाही, आज सर्व शेतकरी अडचणीत आहेत. भारनियमन रद्द करून कोणतीही वसूली करू नये अशी मागणी यावेळी सोळंके यांनी केली. यावेळी प्रभाकर धुमाळ, एम. डी . सवणे, डॉ. प्रदिप चव्हाण, मा. सरपंच मुळे सह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थीत होते.
तालुक्यात आधीच पावसाने दडी दिली आहे. वीज नसल्याने शेतकºयांना कपाशी. तुरीच्या पिकाला पाणी देता येत नसल्याची खंत मोर्चेकºयांनी व्यक्त केली. यामुळे तालुक्यातील भारनियमन बंद करण्याची मागणी करण्यात आली.
आश्वासनाची पूर्तता होईना : आकात
मोर्चाला संबोधीत करतांना सभापती कपिल आकात म्हणाले की, या शासनाने राज्य भारनियमन मुक्त करुन असे निवडणुकीच्या वेळी अश्वासन दिले होेते. मात्र अद्यापही आश्वासनाची पुर्तता झाली नसल्याने जनतेची निराशा झाली आहे. शेतकºयांना व सर्व सामान्य जनतेस खोटी अश्वासने देवून सत्ता मिळवली मात्र सत्तेत आल्यानंतर हे सरकार आश्वासने विसरले आहे. आज सर्वत्र दुष्काळी परिस्थीती निर्माण झाली आहे. शेतकºयांना वीज नाही. थोडेबहूत पाणी शेतकºयाकडे आहे, मात्र वीजेअभावी ते सुध्दा पिकांना देता नाही. यामुळे शेतकरी हैराण आहे.यामुळे शेतकरी विरोधी असलेल्या या सरकारला खाली खेचण्याची वेळ आली असल्याचे कपिल आकात म्हणाले.
भारनियमन बंद करण्याची मागणी
जाफराबाद : तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थीती असतांना आणि पारंपारिक नवरात्र, दसरा व दिवाळी सणांच्या तोंडावरच महावितरण कंपनीने भारनियमन सुरु करुन भक्तांच्या श्रध्देला भारनियमनचा शॉक दिला आहे. वीज नसल्याने शेतकºयांना पिकाला पाणी देता येत नसल्याची खंत मोर्चेकºयांनी व्यक्त केली. भारनियमन तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस वतीने महावितरणने उपकार्यकरी अभियंता यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष राजेश म्हस्के, गजानन ऊबाळे, दत्तु अंभोरे, नितीन शिवणकर, गजानन शेवत्रे गोपाल लोखंडे, पांडु लोखंडे, राहुल वाकडे, संतोष अंभोरे, संदिप पंडित, शेख मोईज, मिर्झा जाहेदबिन, सदानंद सगट, पाडुरंग लोखंडे, गणेश लोखंडे, बाळु पंडीत, सतीष ताकपीरे, देविदास खरात आदीच्या स्वाक्षºया आहे.

Web Title: NCP's Front Against Electricity Ordinance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.