राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:56 AM2019-02-26T00:56:26+5:302019-02-26T00:56:31+5:30
सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी जाफराबाद येथे पोलीस प्रशासन, आणि सत्ताधारी भाजपा पक्षाच्या विरोधात तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : भाजपा सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस प्रशासन त्यांना अभय देत आहे. पोलिसांना हाताशी धरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी जाफराबाद येथे पोलीस प्रशासन, आणि सत्ताधारी भाजपा पक्षाच्या विरोधात तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून या निषेध मोर्चाला सुरुवात येथून सुरुवात करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्ग जाऊन तहसीलच्या प्रांगणात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
यावेळी माजी आ. चंद्रकांत दानवे यांनी खा.रावसाहेब दानवे, आ.संतोष दानवे यांच्यावर खालच्या पातीळीवर टीका केली.
राजकीय दबावापोटी पोलिसांनी कोणतीच वस्तुस्थिती न पाहता, तलवारी बाळगणे, शस्ञ बाळगणे, कट कारस्थान रचणे, सामाजिक कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करत असल्याने सर्वसामान्य नागरिकांत रोष आहे.
दोघे पिता - पुत्र सत्तेचा दुरुपयोग करत असल्याची टीका यावेळी चंद्रकांत दानवे यांनी केली.
सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. जनताच त्यांना धडा शिकवेल असे दानवे यावेळी म्हणाले.
यावेळी ये सरकार हमसे डरती है.. पोलीस को आगे करती हे. या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
यावेळी राकाँचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब वाकुळणीकर, मतदारसंघ पक्षनिरीक्षक रवींद्र तौर, सुधाकर दानवे, तालुकाध्यक्ष राजेश चव्हाण, रामधन कळंबे, दत्तू पंडित, रमेश सपकाळ, राजेश म्हस्के, शेख कौसर, शेख मुजीब, शेख सऊद, साबेद चाऊस, अंकुश जाधव,लक्ष्मण ठोंबरे, बी.एन.कड, महेश औटी यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.