नेहरु शर्ट, ट्राऊझर खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:29 AM2019-04-06T00:29:35+5:302019-04-06T00:30:26+5:30

खास प्रचारासाठी खादीचे कपडे खरेदी करण्यासाठी उमेदवार, युवा कार्यकर्ते गर्दी करत असल्याचे बाजारात दिसून आले.

Neighborhood shirts, crowds for purchasing trousers | नेहरु शर्ट, ट्राऊझर खरेदीसाठी गर्दी

नेहरु शर्ट, ट्राऊझर खरेदीसाठी गर्दी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. यामुळे खास प्रचारासाठी खादीचे कपडे खरेदी करण्यासाठी उमेदवार, युवा कार्यकर्ते गर्दी करत असल्याचे बाजारात दिसून आले.
निवडणुकीचे तंत्रमंत्र सगळेच बदलले आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षापासून खादीचे महत्व अद्यापही कायम आहे. खादीमध्ये गांधी खादी, बंगाल खादी, पांढरी, शु्रभ खादीच्या शर्ट ट्राउझरला मागणी वाढली आहे. ३०० रुपयांपासून ते ८०० रुपये मिटर तसेच नेहरु शर्ट ८८५, ट्राउझर ७५० आदी भावाने विक्री होत आहे. यामध्ये युवाकार्यकर्त्यांमध्ये नेहरु शर्टची क्रेझ आहे. विविध रंगामध्ये खादीचे कपडे उपलब्ध आहेत. प्रचारामध्ये राजकीय मंडळी पांढऱ्या रंगाच्या खादीला अधिक पसंती देत असल्याने येथील खादी ग्रामोद्योग भांडार मधून खादीच्या पांढऱ्या रंगाच्या खादी कापडाची मागणी वाढली असल्याचे व्यवस्थापक बालाजी भालके यांनी सांगितले.
तसेच खादीचा कपडा घेऊन पोषाक शिवून घेण्यासाठी विविध पक्षाचे नेते कार्यकर्त्यांचा कल वाढला आहे. यामुळे अनेकांनी औरंगाबाद, तसेच नांदेड येथील खादीग्रामोद्योग येथील मुख्य कार्यालयातून खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत.
यामुळे खादी शिवून देणाºया टेलरकडे सुध्दा गर्दी वाढली आहे. खादीचा नेहरु शर्ट कॉटनचा पुनापॅट हा नेत्याचा खास पोशाख आहे. निवडणूक लक्षात घेता उमेदवार, कार्यकर्ते विविध रंगांच्या नेहरु शर्टला पसंती देत आहेत.
खांदी ग्रामउद्योग सह बाजारात गडद शेडसह विविध शेड असलेली शर्ट बाजारात विक्रीसाठी आलेली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे कोणी केशरी, कोणी पांढरा, निळा लाल रंगाच्या नेहरु शर्टची खरेदी वाढल्याने दुकानात गर्दी दिसून येत आहे. दरम्यान, मतदार संघाच्या प्रचाराला ९ एप्रिलपासून सुरुवात होत आहे.
खरेदीकडे कल : उन्हापासून बचाव
जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा वाढत आहे. ४२ अंशांपर्यंत पारा चढत आहे. प्रचारादरम्यान खादीचे कपडे घातल्याने उन्हापासून बचाव होतो. यामुळे रेडीमेटच्या जमान्यात खादीचे कपडे शिवून घेण्यासाठी नेते, कार्यकर्त्यांचा कल वाढला आहे. तसेच बाजारात नामांकित खादी कपड्यांना मागणी वाढल्याचे दुकानदार सांगत आहेत.पांढ-या रंगाच्या खादीला प्राधान्य देण्यात येते.

 

Web Title: Neighborhood shirts, crowds for purchasing trousers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.