नेर शाळेत तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:24 AM2021-07-17T04:24:13+5:302021-07-17T04:24:13+5:30
कारवाईची मागणी जालना : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे. तळीरामांमुळे भांडण- तंट्यात वाढ होत आहे. ...
कारवाईची मागणी
जालना : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे. तळीरामांमुळे भांडण- तंट्यात वाढ होत आहे. महिला, मुलींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब पाहता प्रशासकीय पथकांनी अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
गर्दीत सूचनांचे उल्लंघन
परतूर : शहरातील प्रमुख बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीत अनेक नागरिक मास्क वापरासह इतर प्रशासकीय सूचनांकडे दुर्लक्ष करीत आहेत. व्यापारीही सूचनांचे पालन करीत नाहीत. ही बाब पाहता प्रशासकीय पथकांनी कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
पादचाऱ्यांची गैरसोय
बदनापूर : शहरांतर्गत भागातील अनेक ठिकाणचे पथदिवे बंद पडले आहेत. पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांची गैरसोय होते. शिवाय अंधाराचा फायदा भुरटे चोरटे उचलत आहेत. ही बाब पाहता बंद असलेले पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
धोकादायक विद्युत डीपी
जालना : शहरांतर्गत प्रमुख मार्गावर महावितरणचे अनेक विद्युत डीपी आहेत. रस्त्याच्या कडेला असलेले हे विद्युत डीपी उघडे राहत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. ही बाब पाहता संबंधितांनी लक्ष देऊन हे डीपी कुलूपबंद ठेवावेत, अशी मागणी होत आहे.