सरकारसोबत नेटवर्क जाम, एकमेकांना फोनच नाही !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 06:44 AM2024-02-07T06:44:13+5:302024-02-07T06:44:37+5:30
मनोज जरांगे : उपोषणाची वेळ आणू नका
लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री (जि. जालना) : सध्या सरकारसोबत नेटवर्क जाम आहे. एकमेकांना फोनच होत नाहीत. आम्हाला आता फक्त अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर आणि त्याची अंमलबजावणी हवी आहे. या मागणीवर ठाम असून सरकारने उपोषणाची वेळ आणू नये, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केले आहे.
जरांगे-पाटील हे मंगळवारी चार दिवसांच्या दौऱ्यावर गेले. यानिमित्त मंगळवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कामोठे, नवी मुंबई चेंबूर येथे कार्यक्रम आहे. आळंदीला मोठा कार्यक्रम आहे. तिथेच मुक्काम होणार आहे. उद्या मुंबईत वकिलांसोबत बैठक असून, मुंबईतील मराठा आंदोलकांसोबत बैठक आहे. १० तारखेला गोदा पट्ट्यातील मराठा समाजाची बैठक होणार असून, त्यानंतर उपोषण सुरू करणार आहेत. बऱ्याच प्रक्रिया सरकारकडून बाकी आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी हे आमरण उपोषण असल्याचेही जरांगे-पाटील म्हणाले.