शासनाचे नवे नियम लागू : तक्रारीसाठी सहा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:37 AM2021-09-16T04:37:34+5:302021-09-16T04:37:34+5:30
आधी हे होते दोनच पर्याय १) शेतकऱ्यांना विमा कंपनीचे ॲप डाऊनलोड करून त्यावरून पूर्ण माहिती भरून तक्रार करावी लागत ...
आधी हे होते दोनच पर्याय
१) शेतकऱ्यांना विमा कंपनीचे ॲप डाऊनलोड करून त्यावरून पूर्ण माहिती भरून तक्रार करावी लागत होती. हा पर्यायदेखील आता खुला असणार आहे.
२) टोल फ्री क्रमांक हा दुसरा पर्याय होता. मात्र, फोन उचलला जात नसल्यामुळे यावर पीक नुकसानीच्या तक्रारी नोंदविताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
हे आहेत सहा पर्याय
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज कृषी कार्यालयात करावा.
शेतकऱ्यांनी ज्या बँकेत कर्ज काढले आहे त्या बँकेतदेखील पीक नुकसानीसंदर्भात अर्ज करता येतो.
तसेच पीक विमा कंपनीच्या जालना येथील कार्यालयातदेखील तक्रार करता येते.
त्याचबरोबर पीक विमा कंपनीने दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविता येईल.
पीक विमा कंपनीच्या ई-मेलवरदेखील तक्रार नोंदविता येणार आहे.
पीक विमा कंपनीच्या ॲपवरदेखील तक्रार नोंदविता येते.
अतिवृष्टीचे पंचनामे सुरूच
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामे जिल्हा प्रशासन व कृषी विभागाच्या वतीने सुरू आहेत. त्यानुसार अहवाल प्राप्त झाल्यानंतर बाधित क्षेत्र किती आहे, हे लक्षात येणार आहे. मात्र, सरसकट मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
शेतकऱ्यांना पीकनुकसानीसंदर्भात तक्रार कुठे व कशी करावी याविषयी कृषी विभागाकडून जनजागृती केली जात आहे. काही ठिकाणी ऑनलाइन तक्रारीसाठी अडचणी असतील, तर ऑफलाइन नुकसान अर्ज स्वीकारला जात आहे.
-भीमराव रणदिवे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, जालना