शंभर खाटांचे नवीन रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:31 AM2021-07-27T04:31:39+5:302021-07-27T04:31:39+5:30
जिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या शंभर खाटांच्या मेडिकॅब रुग्णालयाचे उद्घाटन तसेच नेत्र विभागात करण्यात आलेल्या नूतनीकरणाचे उद्घाटन टोपे यांच्या ...
जिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या शंभर खाटांच्या मेडिकॅब रुग्णालयाचे उद्घाटन तसेच नेत्र विभागात करण्यात आलेल्या नूतनीकरणाचे उद्घाटन टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. प्रताप घोडके, डॉ. पद्मजा सराफ, डॉ. संजय जगताप, कार्यकारी अभियंता चांडक आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री टोपे म्हणाले, मास्टरकार्ड या कंपनीच्या अर्थसाहाय्याने व अमेरिका इंडिया फाउंडेशन यांच्या सहकार्यातून अत्यंत सुसज्ज व सर्व सुविधांनी युक्त अशा शंभर खाटांच्या मेडिकॅब हॉस्पिटलची उभारणी अवघ्या एका महिन्यात करण्यात आली आहे. मास्टरकार्ड कंपनीमार्फत संपूर्ण देशामध्ये अशाच पद्धतीच्या दोन हजार खाटांच्या रुग्णालयांची उभारणी करण्यात येणार आहे. अशा पद्धतीच्या राज्यातील पहिल्या रुग्णालयाचा शुभारंभ जालन्यामध्ये होत असल्याचा आनंद होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
चौकट
मेडिकल कॉलेजसाठी प्रयत्न व्हावेत
: गोरंट्याल
आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले, जालना जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा चांगल्या पद्धतीने मिळाव्यात, यासाठी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातून अनेकविध प्रकल्प जालना जिल्ह्यात सुरू करण्यात आल्याबद्दल पालकमंत्री महोदयांचे आभार व्यक्त करत जालना जिल्ह्यात मेडिकल कॉलेजच्या उभारणीसाठीही आवश्यक ते प्रयत्न होण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.