नवे पर्व! शक्ती प्रदर्शन करत अंतरवाली सराटीतील ओबीसी बांधवांचा लक्ष्मण हाकेंना पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 07:19 PM2024-06-21T19:19:45+5:302024-06-21T19:20:34+5:30
वडीगोद्रीत शक्ती प्रदर्शन करत अंतरवाली सराटीतील ओबीसी बांधवांचा ओबीसी नेते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांना पाठिंबा, आंदोलकांसाठी आणली भाजी-भाकरी
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : बेमुदत उपोषणाच्या नवव्या दिवशी वडीगोद्री येथे उपोषणकर्ते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून ओबीसी बांधव दाखल होत आहेत. मात्र, दहा महिने मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सूरू होत त्याचं अंतरवाली सराटी गावच्या ओबीसी बांधवांनी आज लक्षवेधून घेतले. अंतरवाली सराटी ते वडीगोद्री येथील ओबीसी उपोषणस्थळापर्यंत डीजेच्या तालावर थिरकत एकच पर्व- ओबीसी सर्व अश्या घोषणा देत ओबीसी बांधवांनी रॅली काढली.
मराठा आरक्षणासाठी आम्ही मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला. मात्र, जरांगे यांनी ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी केल्यानंतर आम्ही विरोध केला. जरांगे पाटील ८ तारखेला उपोषणाला बसले त्याला आमचा विरोध होता. त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलं होतं आमच्या गावात बसू नका. ओबीसी समाजाने आतापर्यंत समर्थन दिल. आता तुम्हाला आमचं समर्थन राहणार नाही, अशी प्रतिक्रिया अंतरवाली सराटीतील ओबीसी बांधवांनी व्यक्त केली.
अंतरवाली सराटी येथून आणला जेवणाचा डब्बा
अंतरवाली सराटी येथून मोठा ओबीसी बांधव सहभागी झाला होता. वडीगोद्री उपोषणस्थळी आलेल्या ओबीसी बांधवांना अंतरवाली सराटीच्या ओबीसी बांधवांनी प्रत्येक घरातून चटणी,भाकर, चपाती, ठेसा, लोणचं असा डब्बा आणत जेवणाची व्यवस्था केली.
दहशतीखाली राहू नका, मी अंतरवालीत येईल
अंतरवाली सराटी गावातील ओबीसी बांधवांनी हाके व वाघमारे यांना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी, तुम्ही आता दहशती खाली राहायचं नाही, मी आहे.. मी अंतरवाली सराटीत तुम्हाला भेटण्यासाठी येईल.