शिबिरातून पाचशे जणांना नवी दृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:49 PM2018-01-31T23:49:13+5:302018-01-31T23:49:46+5:30

: लायन्स क्लब आॅफ जालन्याच्या वतीने संपूर्ण जिल्हा मोतीबिंदूमुक्त करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील पाचशे जणांच्या डोळ्यांच्या मोतीबिंदूचे आॅपरेशन यशस्वीरीत्या केले आहे.

A new vision for five hundred people from the camp | शिबिरातून पाचशे जणांना नवी दृष्टी

शिबिरातून पाचशे जणांना नवी दृष्टी

googlenewsNext

जालना : लायन्स क्लब आॅफ जालन्याच्या वतीने संपूर्ण जिल्हा मोतीबिंदूमुक्त करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील पाचशे जणांच्या डोळ्यांच्या मोतीबिंदूचे आॅपरेशन यशस्वीरीत्या केले आहे. औरंगाबाद येथील एन- वन भागातील लायन्स क्लब आय हॉस्पिटल येथे हे आॅपरेशन पूर्णपणे मोफत होत असून रुग्णांना येण्या-जाण्यासह राहण्याची व जेवणाची सुविधा लायन्स क्लबतर्फे पुरवण्यात येते. यासाठी जालना-परतूर लायन्स क्लबतर्फे १८ लायन्स सदस्यांनी स्वखर्चाने नुकतीच एक नवीन रुग्णवाहिका देखील खरेदी केली आहे.
राणी उंचेगाव येथे रविवारी शिबिरात नेत्र तज्ज्ञांनी ८०० जणांची तपासणी केली होती. यातील २५० जणांना चष्म्याचे वाटप करण्यात आले तर २०० जणांना मोतीबिंदू असल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले. अशा गरजवंतांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी लायन्सने पुढाकार घेतला आहे. यात पहिल्या टप्प्यात २६ जणांच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया सोमवारी यशस्वीरीत्या करण्यात आली.
शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या रुग्णांचा बुधवारी जालन्यात क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष अरुण मित्तल, सचिव ला. निखिल तायल, रिजनल चेअरपर्सन ला. पुरुषोत्तम जयपुरिया, ला. अतुल लढ्ढा, ला. विजय दाड, ला. पंकज दरख, ला. अशोक कोटेचा, राजुरी गु्रपचे कैलास लोया, ला. विजय कागलीवाल, ला. शामसुंदर लोया, ला. भरत मंत्री, स्मिता मित्तल यांच्यासह रुग्णांची उपस्थिती होती.
...............
गरजू व आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या लोकांच्या डोळ्यांच्या मोतीबिंदूचे आॅपरेशन लायन्स क्लबने औरंगाबाद येथे यशस्वीरित्या केले आहे. डोळ्याच्या शस्त्रक्रिया करुन लायन्सने आम्हाला खºया अर्थाने जग दाखवण्याचे पुण्याचे काम केले आहे.
-दामोदर सोनुने, रामनगर ता. जालना)

Web Title: A new vision for five hundred people from the camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.