शहरात रात्रीचा प्रवास धोक्याचाच; अनेक झुंडींनी घेतला रस्त्याचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:35 AM2021-09-14T04:35:29+5:302021-09-14T04:35:29+5:30

जालना : शहरातील नूतन वसाहत, मामा चौकासह इतर विविध भागांतून रात्रीचा प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. मागील महिन्यात शहरासह ...

Night travel in the city is dangerous; Several swarms took control of the road | शहरात रात्रीचा प्रवास धोक्याचाच; अनेक झुंडींनी घेतला रस्त्याचा ताबा

शहरात रात्रीचा प्रवास धोक्याचाच; अनेक झुंडींनी घेतला रस्त्याचा ताबा

Next

जालना : शहरातील नूतन वसाहत, मामा चौकासह इतर विविध भागांतून रात्रीचा प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. मागील महिन्यात शहरासह परिसरातील तब्बल ८१३ जणांचे लचके या कुत्र्यांनी तोडले आहेत.

जालना शहरातील प्रमुख मार्गासह अंतर्गत भागात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यात रात्रीच्या वेळी रस्त्यावरील प्रवास म्हणजे चोरांपेक्षा कुत्र्यांनाच अधिक घाबरण्यासारखे झाले आहे. शहरासह परिसरातील श्वानदंश झालेले तब्बल ६०० ते ८०० रुग्ण महिन्याकाठी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. श्वानदंश होणारी ही आकडेवारी पाहता मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण होणे गरजेचे आहे.

या चौकात जरा सांभाळून

जालना शहरातील मामा चौक, नूतन वसाहत, मोंढा, मंठा रोड, अंबड चौफुलीसह विविध भागामध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. गांधी चमन, शनी मंदिर मार्गासह इतर ठिकाणीही मोकाट कुत्र्यांचे टोळके बसलेले असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी या मार्गावरून चालताना चोरांऐवजी कुत्र्यांच्या टोळक्यापासूनच सांभाळून जाण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे.

आम्हाला

चोराची नाही,

कुत्र्याची

भीती

वाटते

आमच्या वसाहतीत अनेक ठिकाणी मोकाट कुत्रे बसलेले असतात. रात्रीच्या वेळी या कुत्र्यांमुळे आमच्या भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शिवाय अनेकांना कुत्र्यांनी लचके तोडले आहेत. त्यामुळे रात्री बाहेर फिरताना चोरट्यांऐवजी मोकाट कुत्र्यांचीच अधिक भीती वाटत आहे.

- उषा इंगळे, गृहिणी

शहरातील विविध भागांत मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. बाजारपेठ असो अथवा शहरांतर्गत भाग असो कोठेही मोकाट कुत्रे बसलेले असतात. वाहनांच्या मागे कुत्रे धावत असल्याने अपघात होतात. शिवाय अनेक मोकाट कुत्रे चावा घेत असल्याने बालकांसह नागरिकही जखमी होत आहेत.

- अश्विनी जाधव, गृहिणी

शहरातील विविध भागांत कुत्र्यांची संख्या वाढली आहे. कुत्र्यांमुळे लहान मुलं रस्त्यावर जाण्यास घाबरत आहेत. शिवाय काही मोकाट कुत्रे अचानक हल्ला करीत असल्याने ज्येष्ठांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होण्याची गरज आहे.

- रोहिणी सोळंके, गृहिणी

नसबंदी रखडली...

शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. बालकांसह ज्येष्ठांनाही या कुत्र्यांनी लचके तोडले आहेत.

शहरातील मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचा विषय नगरपालिकेच्या सभेतही गाजला होता; परंतु विविध कारणांमुळे निर्बीजीकरणाचा हा विषय रखडत आहे.

कुत्रे आवरा हो!

महिना श्वानदंश

जानेवारी ९९९

फेब्रुवारी १०१८

मार्च ८८६

एप्रिल ७३०

मे ५४०

जून ५९४

जुलै ६६४

ऑगस्ट ८१३

Web Title: Night travel in the city is dangerous; Several swarms took control of the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.