निखिल सपाटे यांना आंतरराष्ट्रीय संशोधनरत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:26 AM2019-03-04T00:26:33+5:302019-03-04T00:27:02+5:30
जालन्याचे भुमिपुत्र निखिल सपाटे यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचा ‘रुला आंतरराष्ट्रीय संशोधनरत्न’ हा पुरस्कार मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालन्याचे भुमिपुत्र निखिल सपाटे यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचा ‘रुला आंतरराष्ट्रीयसंशोधनरत्न’ हा पुरस्कार मिळाला आहे.
तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली येथे एका सोहळ्यात हा पुरस्कार एस. अबुताहिर व कुंदवा मेरी ज्युडिथ यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. वर्ल्ड रिर्सच कौन्सिल, युनायटेड मेडिकल कौन्सिल, अमेरिकन कन्स्युमर्स कौन्सिल तथा आय. जे. रुला यांच्या संयुक्त विद्यमाने मान्यता प्राप्त असा हा पुरस्कार असून याप्रसंगी जर्मनी, इंडोनिशिया, आफ्रिका, सौदी व चायना या देशातील मान्यवर पाहुण्यांची प्रमुख उपस्थिती होती.
निखील सपाटे हे जालना येथील महावितरण कंपनीचे माजी सहाय्यक अभियंता महेश सपाटे यांचे सुपूत्र आहेत. भारतातील युवा संशोधक म्हणून निखील सपाटे यांना प्रा. डॉ. आर. आर. देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा ख्यातनाम पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल निखील सपाटे यांचे सर्वश्री किरण गरड, सुनील ढवळे, वरुण गरड, कैलास लोहीया, शरद काबरा, सुनील साठे, दिनेश गोयल, विक्रम राठोड, प्रसाद पाटील, नेहाल पवार, अनुप खामकर, चेतन नागरे आदींनी अभिनंदन केले आहे.