नऊ तासांनंतर पोलिसांनी फरार आरोपीला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:29 AM2021-05-16T04:29:11+5:302021-05-16T04:29:11+5:30

चंदनझिरा (जि.जालना) : पाणी पिण्याचा बहाणा करून पोलीस ठाण्यातून फरार झालेला खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस नऊ तासांनंतर जेरबंद करण्यास पोलिसांना ...

Nine hours later, police arrested the absconding accused | नऊ तासांनंतर पोलिसांनी फरार आरोपीला पकडले

नऊ तासांनंतर पोलिसांनी फरार आरोपीला पकडले

Next

चंदनझिरा (जि.जालना) : पाणी पिण्याचा बहाणा करून पोलीस ठाण्यातून फरार झालेला खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस नऊ तासांनंतर जेरबंद करण्यास पोलिसांना शुक्रवारी रात्री उशिरा यश आले आहे. श्याम ऊर्फ रमेश चिकटे (वय २७, रा. चंदनझिरा) असे आरोपीचे नाव असून, त्याला पोलिसांनी इंदेवाडी येथून ताब्यात घेतले आहे. जालना शहरातील लक्ष्मण उंबरे यांचा गुरुवारी दुपारी श्याम चिकटे व जितेंद्र आरसूळ यांनी खून केला होता. खून केल्यानंतर दोघेही घटनास्थळावरून फरार झाले होते. शुक्रवारी दुपारी दोघांनाही न्यायालयात हजर केले असता, सहा दिवसांची पोलीस काेठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांना चंदनझिरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. यातील श्याम ऊर्फ रमेश चिकटे याने पाणी पिण्याचा बहाणा करून पोलीस ठाण्यातून पळ काढला. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. पोलीस ठाण्यातून फरार झालेल्या आरोपीला तातडीने ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी या आरोपीचा माग काढत त्याला इंदेवाडी येथून ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक संदीप सावळे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलीस कर्मचारी साई पवार, अनिल काळे, नंदलाल ठाकूर, चंद्रकांत माळी, आदींनी केली आहे.

Web Title: Nine hours later, police arrested the absconding accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.