नऊ जुगाऱ्यांकडून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:35 AM2020-02-12T00:35:29+5:302020-02-12T00:35:44+5:30
उटवद शिवारातील मंठा- जालना रोडवरील हॉटेल जय भारत येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी छापा टाकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना तालुक्यातील उटवद शिवारातील मंठा- जालना रोडवरील हॉटेल जय भारत येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी छापा टाकला. नऊ जुगाऱ्यांसह जुगार साहित्य व रोख रक्कम असा ५ लाख २३ हजार ८९० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दीपक भास्कर जंभोरे (३५, रा. उटवद), शिवाजी पुंजाराम खोमणे (३०, रा. हातवण), आबासाहेब रंगनाथ रंधवे (३८, रा. उटवद), संजय रामदास ढोकळे (२० रा. उटवद), साहेबराव अण्णाभाऊ धुमाळ (३५, रा. हातवण), ज्ञानदेव रंगनाथ भांदरगे (३७, रा. उटवद), गुंडप्पा बापूराव हुंडेकर (५०, रा. चितळीपुतळी), संतोष विश्वनाथ इनकर (३०, रा. बापकळ), सचिन बाबूराव सावंत (३२, रा. बापकळ), असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
मंठा -जालना रोडवरील जय भारत हॉटेलच्या पाठीमागे काही जण जुगार खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली. या माहितीवरून सदरील ठिकाणी छापा टाकला असता, काही जण जुगार खेळत असल्याचे दिसले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जुगार साहित्य, रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी, असा ५ लाख २३ हजार ८९० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोउपनि दुर्गेश राजपूत यांच्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोउपनि. दुर्गेश राजपूत, सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, तुकाराम राठोड, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, पोकॉ. सचिन चौधरी, वैभव खोकले केली आहे.