जिल्ह्यातील नऊ जणांना सर्पदंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:24 AM2021-07-17T04:24:19+5:302021-07-17T04:24:19+5:30
यंदाच्या पावसाळ्यात सर्पदंश होण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्पदंश झाल्याने जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी नऊ जणांना दाखल करण्यात आले. त्यात संपत ...
यंदाच्या पावसाळ्यात सर्पदंश होण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्पदंश झाल्याने जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी नऊ जणांना दाखल करण्यात आले. त्यात संपत बाजीराव राठोड (३६ रा. विरेगाव तांडा), सय्यद अकबर सय्यद हुसेन (७० रा. देऊळगावराजा), सागरबाई आत्माराम दिवटे (५४ रा. गोलापांगरी), छाया ज्ञानेश्वर साबळे (२६ गणेगाव घनसावंगी), नीकिता चमाजी पारवे (१८ कंडारी), राजू नामदेव म्हस्के (४५ सावरगाव), अंबादास ज्ञानेश्वर जऱ्हाड (२२ बदनापूर), वंदना नारायण शिंदे (२३ रा. देहेगव्हाण), रेखा बबलू मदारे (६० रा. जालना) अशी रुग्णांची नावे असल्याचे सांगण्यात आले. संबंधित रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सर्पदंश होऊ नये, यासाठी नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे.