अद्याप कोणालाच उमेदवारी नाही, अंतिम निर्णय २९ तारखेनंतरच - मनोज जरांगे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 12:25 PM2024-08-21T12:25:52+5:302024-08-21T12:26:01+5:30

जरांगे पाटील म्हणाले, आमचा घोंगडीखाली हात गुंतलेला आहे, असे विरोधक आम्हाला सांगत आहेत.

No candidate yet, final decision only after 29th - Manoj Jarange-Patil | अद्याप कोणालाच उमेदवारी नाही, अंतिम निर्णय २९ तारखेनंतरच - मनोज जरांगे-पाटील

अद्याप कोणालाच उमेदवारी नाही, अंतिम निर्णय २९ तारखेनंतरच - मनोज जरांगे-पाटील

वडीगोद्री (जि. जालना) : राज्यात कोणालाच उमेदवारी जाहीर केलेली नाही. २९ तारखेनंतर काय निर्णय व्हायचा तो होईल. इच्छुकांची गर्दी वाढली आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातून गर्दी जास्त येते आहे, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. ते मंगळवारी अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलत होते. 

जरांगे पाटील म्हणाले, आमचा घोंगडीखाली हात गुंतलेला आहे, असे विरोधक आम्हाला सांगत आहेत. संघर्ष आणि लढाई वेगळा भाग आहे आणि आरक्षण वेगळा भाग आहे. माणसाची मने जिंकावी लागतात, तेव्हा सत्ता येते. काही मंत्री, माजी खासदार, आमदार आमच्या संपर्कात आहेत.

पोलिसांची नोटीस मिळाली 
जरांगे पाटील यांना गेवराई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. याबाबत जरांगे पाटील म्हणाले की, सरकार जुनी प्रकरणे उकरून काढत असून, नोटीस बजावत आहे.

तुकाराम मुंढे यांचे भाऊ जरांगेंच्या भेटीला 
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे मोठे बंधू अशोक मुंढे यांनी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
अशोक मुंढे हे गेवराई मतदारसंघातील ताडसोन्ना या गावचे रहिवासी आहेत. गेवराई मतदारसंघातून ते इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. या भेटीबाबत अशोक मुंढे यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.
 

Web Title: No candidate yet, final decision only after 29th - Manoj Jarange-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.