..आता शौचालय बांधकामासाठी ३१ जानेवारीपर्यंत कालमर्यादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 12:59 AM2020-01-07T00:59:57+5:302020-01-07T01:00:33+5:30
जिल्हातील अनेक कुटुंबांची शौचालयाची कामे राहिले आहे. ही कामे पुर्ण करण्यासाठी शासनाने ३१ जानेवारीपर्यंतची मुदतवाढ दिली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्या कुटुंबांनी ३१ डिसेंबरपर्यंत शौचालय बांधावे, अशा सूचना सरकारने जिल्हा प्रशासनास दिल्या होत्या. परंतु, जिल्हातील अनेक कुटुंबांची शौचालयाची कामे राहिले आहे. ही कामे पुर्ण करण्यासाठी शासनाने ३१ जानेवारीपर्यंतची मुदतवाढ दिली असून, या मुदतीत कामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहे.
प्रत्येक घरात शौचालय असावे, यासाठी केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. त्यानुसार जालना जिल्ह्यात २ लाख ६१ हजार ४०३ शौचालये बांधण्यात आली आहेत. २०१२ च्या पायाभूत सर्वेक्षणातून ३५ हजार ८९० कुटुंबे सुटली होती. पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्या कुटुंबांनी ३१ डिसेंबरच्या आत शौचालय बांधावे, अशा सूचना शासनाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहे.