पासपोर्टसाठी पुणेवारी टळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:26 AM2017-12-09T00:26:48+5:302017-12-09T00:26:58+5:30
पारपत्र (पासपोर्ट) काढण्यासाठी आता जालनेकरांना करावी लागणारी पुणेवारी टळणार आहे.
जालना : पारपत्र (पासपोर्ट) काढण्यासाठी आता जालनेकरांना करावी लागणारी पुणेवारी टळणार आहे. मार्च २०१८ पर्यंत जालन्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार असल्याने जालनेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मार्च २०१८ पर्यंत देशाच्या २५१ ठिकाणी नवीन पासपोर्ट केंद्र सुरू होणार असून, यात जालन्याचाही समावेश आहे. मार्च २०१८ पर्यंत राज्यातील २० ठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर, व पिंपरी चिंचवड (पुणे)ही केंदे्र सुरू करण्यात आली असून, आणखी सोळा नवीन केंदे्र सुरू केली जाणार आहे. सध्या जालनेकरांना पासपोर्ट काढण्यासाठी पुणे किंवा सोलापूरला जावे लागते. मात्र, उर्वरित ठिकाणी सुरू करावयाच्या १६ ठिकाणांमध्ये जालन्याचा समावेश आहे. त्यामुळे जालनेकरांना पूर्वी नागपूर व आता पुणे येथे पासपोर्टसाठी मारावे लागणारे खेटे थांबणार आहेत.