मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:50 AM2018-10-23T00:50:01+5:302018-10-23T00:51:05+5:30
पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडलेले असताना त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहे. तसेच दुष्काळी मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नसल्याची ग्वाही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी येनोरा येथे दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : पावसाच्या अवकृपेने यावर्षी जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांची पीके धोक्यात आली असून शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडलेले असताना त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहे. तसेच दुष्काळी मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नसल्याची ग्वाही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी येनोरा येथे दिली.
पालकमंत्र्यांनी सोमवारी परतूर तालुक्यातील येनोरा गावात बालासाहेब कुलकर्णी यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पीक परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी राहुल लोणीकर, एसडीएम ब्रिजेश पाटील, राजाभाऊ कदम, नितीन जोगदंड, रमेश वाघ तलाठी ग्रामसेवक कृषी सहायक आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले की, शेतकºयांच्या पीकांसह दुष्काळसदृश्य परिस्थितीचा तात्काळ सर्वे करून त्याचा अहवाल शासनास देण्यात यावा, असे निर्देश त्यांनी उपस्थित अधिकाºयांना दिले. केंद्र शासनाच्या नियमावलीनुसारच दुष्काळ जाहीर करण्यात येईल.
लवकरच टंचाई घोषित
केंद्र शासनाच्या निकषानुसारच जिल्हा प्रशासनातील दुष्काळ देखरेख समिती अहवाल शासनास सादर करेल. त्यानुसार मा. मुख्यमंत्री ३१ आॅक्टोबरपर्यंत टंचाई घोषित करतील व राज्य शासनाकडून अहवाल केंद्र शासनाकडे सादर केला जाईल व त्यांनतर केंद्र शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यात येऊन दुष्काळात करावयाच्या उपायोजना राबविल्या जातील. एकही गाव किंवा शेतकरी यापासून वंचित राहणार नाही अशा विश्वास यावेळी पालकमंत्री लोणीकर यांनी उपस्थित शेतकºयांना दिला.