वशिलेबाजीला थारा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:33 AM2018-03-11T00:33:41+5:302018-03-11T00:33:46+5:30

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आस्थापनेवरील रिक्त ५० शिपाई पदासाठी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सोमवारपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होत आहे.

No parciality in police recruitments | वशिलेबाजीला थारा नाही

वशिलेबाजीला थारा नाही

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आस्थापनेवरील रिक्त ५० शिपाई पदासाठी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सोमवारपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होत आहे. काहीजण निवड करून देण्याचे प्रलोभन दाखवून उमेदवारांची दिशाभूल करू शकते. त्यामुळे उमेदवारांनी अशा आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
भरती प्रक्रियेत सुुरुवातीला मैदानी चाचणी घेताना बायोमेट्रिक यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे, व्हिडिओ चित्रिकरण, एनएलजेडी, तसेच अत्याधुनिक यंत्राचा वापर करून भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार आहे. उमेदवारांनी गैरप्रकार करण्याचे प्रयत्न करू नये. कुणी पैशाची मागणी करत असेल तर पोलीस अधीक्षक कार्यालय, विशेष पोलीस महा निरीक्षक कार्यालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी केले आहे.

Web Title: No parciality in police recruitments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.