रस्ते दबाई कामासाठी पाण्याचा वापरच नाही; नागरिकांची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:33 AM2019-05-27T00:33:03+5:302019-05-27T00:33:43+5:30
अजिंठा- बुलढाणा या रस्त्याच्या कामाची दबाई करताना पाण्याचा वापर करण्यात येत नसल्याची तक्रार धावडा येथील माजी उपसरपंच जुमान चाऊस यांनी तहसीलदारांकडे नुकतीच केली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : अजिंठा- बुलढाणा या रस्त्याच्या कामाची दबाई करताना पाण्याचा वापर करण्यात येत नसल्याची तक्रार धावडा येथील माजी उपसरपंच जुमान चाऊस यांनी तहसीलदारांकडे नुकतीच केली आहे़
अंजिठा ते बुलढाणा रस्त्याचे काम सुरू होऊन दोन वर्ष झाले आहे. तरी सुध्दा काम पुर्ण झाले नाही. शिवाय या रस्त्यावरील दोन कंत्राकदार आतापर्यंत बदलण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम रेंगाळले असुन सध्या एका कंत्राकदाराला हे काम तोडून देण्यात आले आहे. संबधीत कंत्राकदाराने या रस्त्याचे खोदकाम करून दबाई सुरू केली आहे.
मात्र, ही दबाई करताना पाण्याचा वापरच करण्यात येत नसून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे. त्यामुळे काम लवकरच खराब होण्याची शक्यता असून सदरील काम चांगल्या दर्जाचे करून घेण्यासाठी नॅशनल हायवे विभागाचे अधिकाऱ्याचे दुर्लक्ष झाले आहे. या कंत्राकदारावर कोणाचाच वचक राहिलेला नाही. त्यामुळे संबधीतावर कारवाई करावी व दबाई करताना पाणी वापरावे अशी मागणी माजी उपंसरपच जुमान चाऊस, बाळा बोरमळे, हनिफ मामु, मंजाराम देवकर, आंनदा इंगळे आदींनी केली आहे.