चक्क मृताच्या नावाने नोटरी...! फसवणूक : वकील पिता- पुत्राविरुद्ध भोकरदन पोलिसात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 03:55 AM2017-10-16T03:55:36+5:302017-10-16T03:55:42+5:30

प्लॉट विक्रीसाठी मृत व्यक्तीच्या नावाने बनावट नोटरी करून फसवणूक करणा-या वकील पिता-पुत्रांवर शनिवारी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एकास पोलिसांनी अटक केली असून

Notary in the name of dead ...! Cheating: A complaint against the father-son Bhokardan policeman | चक्क मृताच्या नावाने नोटरी...! फसवणूक : वकील पिता- पुत्राविरुद्ध भोकरदन पोलिसात गुन्हा

चक्क मृताच्या नावाने नोटरी...! फसवणूक : वकील पिता- पुत्राविरुद्ध भोकरदन पोलिसात गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन (जि. जालना): प्लॉट विक्रीसाठी मृत व्यक्तीच्या नावाने बनावट नोटरी करून फसवणूक करणा-या वकील पिता-पुत्रांवर शनिवारी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एकास पोलिसांनी अटक केली असून, दुसरा फरार झाला आहे.
याबाबत बाबासाहेब पगारे (रा. नळणी) यांनी फिर्याद दिली आहे. अ‍ॅड. राहुल शिंदे व त्याचे वडील अ‍ॅड. अशोक शिंदे (रा. भोकरदन) यांनी आपणास वालसा डावरगाव व बेलोरा शिवारात दोन प्लॉट विक्रीसाठी असून, तुम्हाला प्लॉट खरेदी करायचे आहेत काय, अशी विचारणा केली.
१२ आॅक्टोबर २०१७ रोजी राहुल शिंदे यांनी राजू भागाजी कराळे यांचा ६४० चौरस फुटांचा ४० हजार रुपये किमतीचा व अंकुश बाजीराव कोल्हे (रा़ बेलोरा) यांचा ८७५ चौरस फुटांचा प्लॉट ३० हजार रुपयांत मिळवून देतो, असे सांगितले. तेव्हा त्यांनी दोन्ही प्लॉटचे एकत्रित पाच हजार रुपये कमी करण्याचे सांगितले. २० हजार रुपये आगाऊ म्हणून राहुल शिंदे यांच्याकडे दिले गेले. त्यानंतर प्लॉटबाबत खात्री करण्यासाठी १३ आॅक्टोबर रोजी वालसा डावरगाव व बेलोरा येथे गेलो असता, नोटरीच्या आधारे ज्यांच्या नावाचा प्लॉट आहे, त्या दोन्ही व्यक्ती मृत झाल्याचे गावकºयांनी सांगितले.

एकास अटक; दुसरा फरार

ग्रामपंचायतीमध्ये जाऊन खात्री केली असता, ज्यांच्या नावे प्लॉट दाखविला होता, त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र ग्रामपंचायत कार्यालयाने दिले, तसेच प्लॉटचे मूळ मालक शेषराव सिरसाठ व माणिक मोरे या दोघांचेही काही वर्षांपूर्वी निधन झाल्याचीही माहिती दिली. त्याचप्रमाणे प्लॉटची नोटरी केलेली कागदपत्रे बोगस असल्याचे सांगितले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पगारे यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात जाऊन अ‍ॅड. राहुल शिंदे व अ‍ॅड. अशोक शिंंदे यांच्या विरुद्ध फसवणूक केल्याची तक्रार दिली.
पोलिसांनी अ‍ॅड. राहुल शिंदे यांना अटक करून, १४ आॅक्टोबरला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केला. अ‍ॅड. अशोक शिंदे हे फरार आहेत़ पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सांखळे तपास करीत आहेत.

Web Title: Notary in the name of dead ...! Cheating: A complaint against the father-son Bhokardan policeman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा