विना परवानाधारक १६ व्यावसायिकांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:36 AM2018-10-10T00:36:53+5:302018-10-10T00:37:32+5:30

अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाकडून शहरातील ८० हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. तसेच विना परवानाधारक सोळा व्यावसायिकांना नोटीसा बजावल्या आहे. अन्न सुरक्षेचे निकष न पाळण्याऱ्या परवानाधारक व्यावसायिकांना त्रुटींची पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

Notice to 16 non-licensed businessmen | विना परवानाधारक १६ व्यावसायिकांना नोटीस

विना परवानाधारक १६ व्यावसायिकांना नोटीस

Next
ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासनाची कारवाई : शहरातील ८० हॉटेल्सची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाकडून शहरातील ८० हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. तसेच विना परवानाधारक सोळा व्यावसायिकांना नोटीसा बजावल्या आहे. अन्न सुरक्षेचे निकष न पाळण्याऱ्या परवानाधारक व्यावसायिकांना त्रुटींची पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
कायदेशीर परवाना न घेता शहरात अनेक ठिकाणी लहान मोठे खाद्य पदार्थाचे व्यवसाय सुरू झाले आहे. तसेच अन्न सुरक्षेबाबत परवानाधारक व्यावसायिकांकडून नियम पाळले जात नाही. अन्न व औषध प्रशासनाने अशा परवाना धारक व विना परवाना धारक हॉटेल्स, हातगाडीवर खाद्यपदार्थ विक्री करणाºयावर कारवाई केली आहे. तसेच अन्न सुरक्षेचे निकष न पाळणाºया परवानाधारक हॉटेल्सचीही प्रशासनाकडून तपासणी करण्यात आली असून, त्रुटी आढळलेल्या ८० हॉटेलसना त्रुटीची पुर्तता करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. या हॉटेल्सची पुन्हा ङ्खफेरतपासणी होणार असून त्रुटीची पुर्तता न केलेल्या व्यावसायिकांवर परवाने रद्द करण्याची तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त एस.एस देसाई यांनी दिली आहे.
नवरात्रीनिमित्त विशेष मोहिम राबविणार
नवरात्रीनिमित्त अन्न व प्रशासनाकडून विशेष मोहिम राबविण्यात येणार असून, यात प्रसाद तयार करणाºया दुकानदारांची तपासणी करण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. यात कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: Notice to 16 non-licensed businessmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.